Pune News : आगामी काळात महाराष्ट्रासह देशभरात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. शिवाय पुढल्या वर्षी लोकसभा इलेक्शन राहणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळी विकासाची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जी कामे प्रलंबित आहेत त्यांना गती दिली जात आहे तसेच जी कामे अंतिम टप्प्यात आली आहेत त्यांचे लोकार्पण देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस सरकारचा आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेला पुणे रिंग रोड जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेला पुणे औरंगाबाद ग्रीनफिल्ड कॉरिडॉर देखील जलद गतीने पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वास्तविक पुणे औरंगाबाद ग्रीन फिल्ड कॉरिडोर आणि पुणे रोड बारा गावातून एकत्र जात आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! आता मेट्रो थेट उल्हासनगरपर्यंत धावणार; असा राहणार रूटमॅप, पहा
यामुळे रिंग रोडला या पुणे औरंगाबाद ग्रीन फिल्ड कॉरिडॉर चा फायदा होत असल्याचे मत राज्य रस्ते विकास महामंडळाने व्यक्त केले आहे. या ग्रीनफिल्ड कॉरिडॉरमुळे रिंग रोडच 30 किलोमीटरच अंतर कमी होणार असून हे 12 गावांमधील 30 किलोमीटरपर्यंतच काम एन एच आय च्या माध्यमातून होणार आहे.
यामुळे एमएसआरडीसीच्या खर्चात जवळपास 3000 कोटी रुपयांची बचत होणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे पुणे रिंग रोड हा पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभागला गेला असून या दोन भागात या रस्त्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. हा रस्ता राज्य रस्ते व विकास महामंडळ पूर्ण करणार आहे.
पूर्व रिंग रोडचा विचार केला तर हा रिंग रोड जिल्ह्यातील पाच तालुक्यातून प्रस्तावित आहे. त्याची लांबी ही एकूण 66 किलोमीटर आहे. हा रिंगरोड पुणे सातारा रस्त्यावरील वरवे ब्रदुक येथून सुरू होणार असून पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से येथे येऊन मिळणार आहे. विशेष म्हणजे पश्चिम रिंग रोड प्रमाणेच या पूर्व रिंगरोडची भूसंपादनाची प्रक्रिया देखील लवकरात लवकर पूर्ण केली जाणार आहे.
दरम्यान पुणे रिंग रोड आणि पुणे औरंगाबाद ग्रीनफिल्ड महामार्ग ज्या बारा गावांमध्ये एकत्र येत आहे त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काम करावे आणि त्यासाठी खर्च देखील प्राधिकरणानेच करावा असे ठरल आहे. निश्चितच राज्य रस्ते विकास महामंडळाचा मोठा खर्च यामुळे वाचणार आहे.
हे पण वाचा :- बातमी कामाची ! गृह कर्ज काढण्याचा विचार करताय? मग जाणून घ्या कोणत्या बँका देतायेत स्वस्तात Home Loan