Pune News : शिक्षणाचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वेगवेगळी रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे रिंग रोड चे काम एमएसआरडीसीने हाती घेतले आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान ग्रीनफिल कॉरिडोर विकसित केला जात आहे.
या दोन्ही मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सध्या स्थितीला सुरू आहे. अशातच आता पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी चार नवीन फ्लाय ओव्हर म्हणजेच उन्नत मार्गाची घोषणा नितीन गडकरी यांनी केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता या चार मार्गावर फ्लाय ओव्हर तयार केले जाणार असून यासाठी तब्बल 53 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
11 मार्च 2023 रोजी म्हणजेच शनिवारी नितीन गडकरी यांनी याची घोषणा केली आहे. गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक फाटा ते खेड,तळेगाव ते चाकण, हडपसर ते दिवेघाट आणि वाघोली ते शिरुर या चार मार्गावर फ्लाय ओव्हर तयार केले जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक फाटा ते खेड हा २९ किलोमीटरचा मार्ग राहणार असून यासाठी आठ हजार कोटी रुपये खर्च लागणार आहे.
तळेगाव ते चाकण ५४ किमीसाठी ११ हजार कोटीचा खर्च अपेक्षित आहे. हडपसर ते दिवेघाट १२ किमी मार्गासाठी ८२३ कोटीचा खर्च लागणार आहे आणि वाघोली ते शिरुर ५६ किमी मार्गासाठई १० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! आता ‘त्या’ मार्गावरही धावणार बेस्टची ई-डबल डेकर बस; ‘या’ दिवशी सुरु होणार सेवा
यासोबतच गडकरी यांनी पुणे बेंगलोर आणि पुणे छत्रपती संभाजीनगर दरम्यान महामार्ग विकसित होत असल्याची माहिती देखील दिली आहे. विशेष म्हणजे या दोन महामार्गांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.
निश्चितच पिंपरी चिंचवड मध्ये चार नवीन फ्लायओवर तयार होणार असल्याने याचा पिंपरी चिंचवड शहरातील ट्रॅफिकच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.
हे पण वाचा :- काय सांगता ! राजधानी, शताब्दी बंद होणार आता देशात फक्त वंदे भारत एक्सप्रेस धावणार; पहा रेल्वेचा मेगाप्लॅन