Pune News : महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. खरे तर सध्या राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत म्हणजेच एक आणि दोन सप्टेंबरला राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी अक्षरशः अतिवृष्टी सारखा पाऊस झाला असून यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अशातच आता राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी दिलासादायक बातमी हाती आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाची पेरणी केली होती त्या शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने अनुदानाची घोषणा केली आहे.
खरीप हंगाम 2023 मध्ये अत्यल्प उत्पादन आणि कवडीमोल बाजार भाव यामुळे संकटात आलेल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत जाहीर करण्यात आले होते.
म्हणजेच या योजनेअंतर्गत कमाल दहा हजाराचे अनुदान मिळणार आहे. तसेच ज्यांनी वीस गुंठ्यांपेक्षा कमी जमिनीत याची लागवड केली आहे अशा शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे.
दरम्यान आता याचं सोयाबीन आणि कापूस अनुदान योजने संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. काल अर्थातच दोन सप्टेंबर 2024 ला राज्याचे कृषिमंत्री धनुभाऊ यांनी कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना 10 सप्टेंबर पासून अनुदानाची रक्कम वितरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अनुदान वाटपात येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवून शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान कसे मिळेल याबाबत त्यांनी काल एक विशेष बैठक घेतली होती. याचं बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना 10 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान वर्ग करण्याच्या सूचना केल्या आहेत.
खरे तर 30 ऑगस्ट ला या योजनेच्या अनुदान वाटपाची कार्यपद्धती शासनाने ठरवून दिली होती. मात्र पात्र शेतकऱ्यांच्या नावाचा घोळ अजूनही कायम आहे. याच अडचणींच्या पार्श्वभूमीवर काल कृषिमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक घेतली.
या बैठकीत कृषिमंत्री महोदयांनी अनुदान वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या १० सप्टेंबर पासून अनुदानाची रक्कम दिली जावी असे निर्देश दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ज्या सोयाबीन आणि कापूस अनुदानाची वाट पाहिली जात होती त्या अनुदानात आहे त्या काही दिवसांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असे दिसत आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.