Pune News : पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी रेल्वे प्रवाशांसाठी विशेष खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातून तीन विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या जाणार आहेत. खरंतर, पुढल्या महिन्यात 19 सप्टेंबरला गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे.
19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी पासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आणि 28 सप्टेंबर 2023 पर्यंत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातून कोकणात मोठ्या प्रमाणात भाविक जाणार आहेत. दरम्यान कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी पुणे रेल्वे विभागाने तीन विशेष गाड्या सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
यामुळे कोकणवासीयांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाताना याचा मोठा फायदा होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण पुण्यातून कोणत्या दिवशी विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत याचे वेळापत्रक कसे राहणार आहे याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.
केव्हा धावणार विशेष गाड्यां
पुणे रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातून कोकणात 15, 22 आणि 29 सप्टेंबर रोजी विशेष गाडी चालवली जाणार आहे. ही गाडी गणेशोत्सवासाठी चालवली जाईल. पुणे रेल्वे स्थानकावरून कुडाळ रेल्वे स्थानकादरम्यान ही गाडी चालवली जाणार आहे. पुणे ते कुडाळ दरम्यानच्या या विशेष गाडीला कोकणातील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा दिला जाणार आहे.
पुणे ते कुडाळ विशेष रेल्वे गाडीचे वेळापत्रक कसे राहणार
ही गाडी पुण्याहून 15, 22 आणि 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता कुडाळ कडे रवाना होणार आहे. तसेच कुडाळ ते पुणे ही रेल्वे गाडी कुडाळ वरून 17 सप्टेंबर, 24 सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजून पाच मिनिटांनी पुण्याकडे रवाना होणार आहे.
कुठे मिळणार थांबा
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही गाडी लोणावळा, पनवेल, रोहा, मानगाव, खेड, चिपळूण, सावरडा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग या अति महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.