Pune Neo Metro Project : शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुणे संपूर्ण जगात ख्याती प्राप्त आहे. एवढेच नाही तर पुणे आपल्या राज्याचे सांस्कृतिक राजधानी आहे. पुणे शहराला मोठे ऐतिहासिक वैभव आणि महती प्राप्त आहे. मात्र अलीकडे पुणे शहरात वाहतूक कोंडी ही मोठी जटील समस्या बनली आहे. शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस विस्तारत आहे.
परिणामी वाहनांची संख्या वाढली आहे आणि यामुळे वाहतूक कोंडी देखील शहरात मोठ्या प्रमाणात आता होऊ लागली आहे. वाहतूक कोंडीचा तिढा सोडवण्यासाठी मात्र शासनाकडून आणि प्रशासनाकडून मोठ्या वेगवान हालचाली होत आहेत. वेगवेगळी रस्ते विकासाची प्रकल्प शासनाच्या माध्यमातून पूर्ण केली जात आहेत.
यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे रिंग रोड चे काम हाती घेण्यात आले आहे. सोबतच शहरात इतरही अनेक महत्त्वाची कामे प्रस्तावित आहेत. याशिवाय पुणे शहरात मेट्रोचे काम देखील जलद गतीने सुरू आहे. नागरिकांनी अधिका-अधिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याचे काम शासनाचे माध्यमातून पुणे शहरात केले जात आहे.
हे पण वाचा :- 14वी वंदे भारत ट्रेन आज सुरु होणार; कोणती महत्वाची शहरे होणार कनेक्ट, मुंबई-गोवा वंदे भारतला मुहूर्त केव्हा? पहा डिटेल्स
शहरात मेट्रोचे काम हाती घेण्यात आले आहे. सिटी बसेस देखील मोठ्या प्रमाणात सुरू करण्याचे नियोजन आहे. यासोबतच आता निओ मेट्रो सुरू करण्याचा मानस शासनाचा, प्रशासनाचा आहे. यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून जोमात प्रयत्न सुरू झाले आहेत. यामुळे लवकरच पुणेकरांना निओ मेट्रोची भेट मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार महा मेट्रो ने पुणे शहरात निओ मेट्रो सुरु करण्यासाठी आवश्यक असलेला आराखडा तयार केला आहे.
आता लवकरच महानगरपालिकेचे अधिकारी जागेची पाहणी करणार असल्याचे सांगितले जात आहे. जवळपास 44 कि.मी. लांबीच्या एचसीएमटीआर या एलिव्हेटेड वर्तुळाकार प्रकल्पाची गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा होत होती. मात्र आता हालचाली अधिक गतिमान होत आहेत. यामुळे हा प्रकल्प लवकर कार्यान्वित होईल आणि पुणेकरांना दिलासा मिळेल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा निओ मेट्रो मार्ग प्रकल्प मेट्रो मार्गाला जोडला जाणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ ठिकाणी फक्त 17 लाखात घर मिळणार, पहा…..
शहरात जवळपास आठ ठिकाणी मेट्रो आणि निओ मेट्रो एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, बोपोडीपासून सुरू होणारा मार्ग विद्यापीठ चौक, सेनापती बापट रोड, कोथरूड, एरंडवणे, म्हात्रे पूल, सिंहगड रस्ता, सारसबाग, स्वारगेट, सातारा रोड, बिबवेवाडी, कोंढवा-एन आयबीएम रोड, वानवडी, एम्प्रेस गार्डन, मुंढवा, विमाननगर, विश्रांतवाडी, येरवडा, खडकी बाजार इत्यादी भागांतून प्रस्तावित करण्यात आला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पुणे निओ मेट्रोसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून निविदा अर्थातच टेंडर मागवण्यात आले आहेत. या निविदा जवळपास 5192 कोटी रुपयांच्या राहणार आहेत. दरम्यान या प्रकल्पासाठी आवश्यक निधी केंद्र शासनाच्या माध्यमातून उभारला जाईल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त केला जात आहे. निश्चितच, पुणे निओ मेट्रो प्रकल्पाला आता गती देण्यात आली आहे, त्यामुळे हा प्रकल्प जलद गतीने पूर्ण होईल आणि शहरातील वाहतूक व्यवस्था आणखीनच बळकट होईल असा आशावाद यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; तब्बल ‘इतके’ दिवस ‘या’ लोकल ट्रेनच्या फेऱ्या राहणार बंद, पहा यादी