Pune Nashik Railway : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने पुणे अहमदनगर आणि नासिक या तीन जिल्ह्यासाठी अति महत्त्वाच्या अशा पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेला तत्वतः मंजुरी दिली आहे. मात्र मंजुरी मिळाली असली तरी देखील या मार्गावर नेमकी कोणती ट्रेन धावेल याबाबत कोणतीच माहिती अजून समोर आलेली नाही.
म्हणजे आता या रेल्वेमार्गावर सेमी हायस्पीड रेल्वे, रेल्वे कम रोड की एलिव्हेटेड रेल्वे नेमकी कोणती रेल्वे भरधाव वेगाने धावेल याबाबत कोणतीच माहिती हाती आलेली नाही. यामुळे या रेल्वे मार्गावर रेल्वेसाठी तत्वतः मंजुरी मिळाल्यानंतरही कोणती रेल्वे धावेल हे अजून गुलदस्त्यातच बंद आहे. यामुळे आता पुणे नासिक दरम्यान कोणती रेल्वे धावेल याची माहिती डीपीआर समोर आला तेव्हाच कळणार आहे.
खरं पाहता, पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे वर्तमान उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हेच कारण आहे की त्यांनी शिवसेना-भाजप युती असताना आणि स्वतः मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला मंजुरी मिळवून घेतली. मात्र तदनंतर राज्यात राजकीय उलथा पालथ झाली. भाजप सेना युतीचे सरकार सत्तेतुन पायउतार होत महाविकास आघाडी सरकार राज्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना प्रणित या महाविकास आघाडी सरकार मध्ये या रेल्वेच्या कामाला गती देण्यात आली. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने राज्य हिस्यातला वीस टक्के निधी महारेल ला दिला. मग लगेचच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली. भूसंपादनात जमिनीच्या मोबदल्यात जमीन धारकांना कोट्यावधीचा मोबदला मिळाला. यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीच भूसंपादन करण्यात आलं.
एका आकडेवारीनुसार केवळ दोन महिन्याच्या कालावधीत पुणे जिल्ह्यामध्ये दीडशे हेक्टर जमीन या रेल्वेसाठी अधिग्रहित झाली. आता एवढ्या गतीने या रेल्वेचे काम होत असल्याने 2023 पर्यंत ही रेल्वे धावेल असं चित्र तयार झालं. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप आला. महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आले. यादरम्यान मात्र या रेल्वे प्रकल्पावर आक्षेप नोंदवण्यात आले.
सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग जमिनीवरून असल्याने जनावरे, प्राणी आडवे येऊन अपघात होऊ शकतात. असा हा आक्षेप होता. यामुळे पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेला खोडा लागला. आता यानिमित्ताने नवीन संकल्पना देखील पुढे आली. आता पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाऐवजी ‘रेल्वे कम रोड’चा विचार करा, अशा काही सूचना संबंधितांकडून पुढे करण्यात आल्या. यामुळे पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी भूसंपादनाची प्रक्रिया खोळंबली.
दरम्यान आता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने या रेल्वेसाठी तत्त्वता मंजुरी दिली आहे म्हणून नेमकी कोणती रेल्वे मंजूर झाली आहे हे प्रत्यक्षात डीपीआर समोर आल्यानंतर करणार असल्याचे जाणकार नमूद करत आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की गेल्या तीन चार महिने या संदर्भात वारंवार बैठकां सुरू होत्या. लोकप्रतिनिधी ही रेल्वे लवकरात लवकर व्हावी यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून बैठकांवर बैठका आयोजित झाल्या.
दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे त्यांनी देखील केंद्रीय स्तरावर या रेल्वेसाठी कायमच पाठपुरावा केला. दरम्यान पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेवर जो काही आक्षेप घेतला होता तो आक्षेप दूर करून एक नवीन प्रस्ताव राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आणि याच सुधारित प्रस्तावाला आता मान्यता देण्यात आली आहे.
विशेष बाब अशी की या नव्याने सादर झालेल्या प्रस्तावात देखील काही त्रुटी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या त्रुटी आता राज्य शासनाच्या माध्यमातून आणि केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून दूर केले जाणार आहेत. या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासन आणि केंद्रीय रेल्वे मंत्रालय संयुक्तपणे प्रयत्न करणार आहे. त्रुटी दूर झाल्यानंतर या रेल्वेचा खराखुरा डीपीआर हा समोर येईल.
जेव्हा अंतिम डीपीआर पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे चा बनेल तेव्हाच पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गच राहणार, रेल्वे कम रोड करणार की एलिव्हेटेड रेल्वेमार्ग करणार याची स्पष्टोक्ती येणार असल्याचे सांगितले जात आहे. एकंदरीत बघायला गेलं तर या रेल्वेला तत्वता मंजुरी देण्यात आली असली तरी देखील नेमकी कोणती रेल्वे या मार्गावर धावणार आहे या संदर्भात सर्व बाबी गुलदस्त्यात कैद आहेत. त्यामुळे या रेल्वे मार्गावर नेमकी कोणती रेल्वे धावेल याची सर्वांनाच उत्सुकता लागून असून आता या रेल्वे मार्गाच्या अंतिम डीपीआर कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.