Pune Nashik Railway : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई, राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि राज्यातील एक महत्त्वाची कृषी बाजारपेठ नाशिक ही राज्यातील सुवर्ण त्रिकोणातील तीन महत्त्वाची शहरे आहेत.
या तिन्ही शहरांच्या विकासावरूनच महाराष्ट्राचा विकास मोजला जातो. मात्र असे असले तरी अजूनही नाशिक ते पुणे असा थेट रेल्वे मार्ग तयार झालेला नाही. आज भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे चार महिने आणि सहा दिवस पूर्ण झाले आहेत.
म्हणजेच जवळपास भारत स्वातंत्र्य होऊन आठ दशकांचा काळ पूर्ण झाला आहे. तथापि नासिक आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरादरम्यान थेट रेल्वे मार्ग नाहीये.
खरे तर या दोन्ही शहरा दरम्यान रोजाना हजारो नागरिक प्रवास करत असतात. अशा परिस्थितीत या शहरा दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना रस्ते मार्गावरच अवलंबून राहावे लागते.
यामुळे या दोन्ही शहरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी, नागरिकांच्या माध्यमातून पुणे ते नाशिक दरम्यान थेट रेल्वे मार्ग तयार केला पाहिजे अशी मागणी केली जात होती.
नागरिकांच्या या मागणीच्या पार्श्वभूमीवर पुणे ते नाशिक दरम्यान सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र या प्रकल्पाच्या आधीच्या डीपीआर मध्ये काही त्रुटी होती.
यामुळे ही त्रुटी दूर करण्यासाठी या प्रकल्पाचा डी पी आर मध्य रेल्वे कडे वर्ग करण्यात आला होता. आता मध्य रेल्वेने या प्रकल्पाचा सुधारित डी पी आर तयार केला आहे.
या डीपीआरमध्ये आधीची त्रुटी दूर करण्यात आली आहे. आता मध्ये रेल्वेने 17,889 कोटी रुपयांचा नवीन सुधारित डीपीआर तयार केला आहे.
विशेष म्हणजे हा सुधारित डीपीआर आता केंद्राच्या रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. यामुळे आता या प्रकल्पाचे काम जलद गतीने मार्गी लागेल अशी आशा आहे.
दरम्यान या प्रकल्पासाठी आता रेल्वे बोर्डाकडून लवकरात लवकर मंजुरी मिळाली पाहिजे आणि या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू झाले पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.