Pune-Nashik Railway : पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची शहरे आहेत. या दोन्ही शहरादरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र, अजूनही नाशिकहून पुण्याला प्रवास करण्यासाठी थेट रेल्वे मार्ग तयार झालेला नाही.
यामुळे या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करायचा असल्यास नागरिकांना रस्ते मार्गानेच जावे लागते. परंतु नाशिक ते पुणे दरम्यान रस्ते मार्गाने प्रवास करण्यासाठी सध्या पाच तासांचा कालावधी खर्च करावा लागतोय.
हेच कारण आहे की या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास जलद व्हावा यासाठी एका नवीन महामार्गाची पायाभरणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे ते नाशिक असा नवीन इकॉनोमिक कॉरिडोर तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
पुणे-नाशिक इकॉनॉमिक एक्सप्रेस वे चा आराखडा तयार करण्यात आला असून हा आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागासमोर मांडला गेला आहे. या महामार्गाला राज्य रस्ते विकास महामंडळाने मान्यता देखील दिलेली आहे.
त्यामुळे या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार अशी आशा व्यक्त होत आहे. हा इकॉनोमिक एक्सप्रेस वे 213 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. यासाठी जवळपास 20000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
या महामार्गामुळे पाच तासाचा प्रवास फक्त आणि फक्त तीन तासात पूर्ण होईल अशी आशा आहे. म्हणजेच नाशिक ते पुण्यादरम्यानचा प्रवास भविष्यात तीन तासात पूर्ण होऊ शकणार आहे.
यामुळे या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आता आपण या महामार्गाचा रूट मॅप थोडक्यात समजून घेणार आहोत.
कसा असेल रूट
हा महामार्ग शिर्डीवरून जाणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार हा प्रस्तावित महामार्ग राजगुरुनगर, चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर, सिन्नर मार्गे थेट शिर्डीकडे जाणार आहे.
इथून मग हा मार्ग नाशिकला कनेक्ट होणार आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, हा महामार्ग एकूण तीन टप्प्यात विभागला जाणार आहे. यात पहिल्या टप्प्यात पुणे ते शिर्डी असा 135 किमीचा मार्ग राहील.
शिर्डी इंटरचेंज ते नाशिक-निफाड इंटरचेंजपर्यंत 60 किमीचा दुसरा टप्पा असणार आहे. दुसरा टप्पा सुरत-चेन्नई एक्सप्रेसवेला जोडला जाणार आहे. तसेच, महामार्गाचा तिसरा टप्पा हा 60 किमीचा राहील जो की, नाशिक-निफाड इंटरचेंज ते नाशिक असा राहणार आहे.