Pune Nashik Railway : मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि पुणे या दोन शहरांना रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र आता या प्रकल्पांतर्गत प्रस्तावित करण्यात आलेला रेल्वेमार्ग बदलला जाणार आहे. स्वतः केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे.
रेल्वेमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे या रेल्वे मार्गात नारायणगाव येथील खोडद या ठिकाणी असणाऱ्या दुर्बिणीचा अडसर येत असल्याने हा रेल्वे मार्ग आता बदलावा लागणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की नारायणगाव येथील खोडद या ठिकाणी असणारी दुर्बिन ही 23 देशांनी मिळून विकसित केलेली आहे.
यामुळे येथून रेल्वे मार्ग बनवणे अशक्य आहे. हेच कारण आहे की सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गात बदल करण्यात येणार आहे. खरंतर पुणे नाशिक आणि मुंबई या तीन शहरांना महाराष्ट्राच्या सुवर्ण त्रिकोणाचा दर्जा देण्यात आला आहे.
या तीन शहरांवरूनच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विकास मोजला जातो. मात्र स्वातंत्र्याचा 7 दशकानंतरही पुणे ते नाशिक दरम्यान रेल्वे मार्ग तयार झालेला नाही.
यामुळे या दोन शहरा दरम्यान प्रवास करायचा असेल तर प्रवाशांना रस्ते मार्गाने जावे लागते. यामुळे नाशिकसह पुण्यातील नागरिकांच्या माध्यमातून नाशिक ते पुणे दरम्यान रेल्वे मार्ग तयार झाला पाहिजे अशी मागणी जोर दरात आहे.
दरम्यान येथील नागरिकांच्या याच मागणीच्या पार्श्वभूमीवर शासनाने पुणे ते नाशिक दरम्यान सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. पण अजूनही या रेल्वे मार्गाचे काम सुरू झालेले नाही.
अजूनही हा मार्ग मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. अशातच आता रेल्वेमंत्र्यांनी मंजुरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या मार्गात बदल होणार असे संकेत दिले आहेत. त्यामुळे, हा रेल्वे मार्ग नेमका कसा राहील, या प्रकल्पाचे काम नेमकं कधी सुरू होणार हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान नाशिक दौऱ्यावर आलेले रेल्वेमंत्री श्री वैष्णव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना देशातील 100 ते 200 किलोमीटर अंतरावरील शहरांना जोडण्यासाठी नमो रॅपिड ट्रेनचा विचार सुरू असल्याची माहिती दिली आहे.
देशातील पहिली नमो रॅपिड ट्रेन ही दिल्ली ते मेरठ या मार्गावर सुरू झाली आहे. तसेच भविष्यात महाराष्ट्रातही अशा इंटरसिटी नमो रॅपिड ट्रेन पाहायला मिळतील अशी घोषणा रेल्वेमंत्र्यांनी यावेळी केली आहे.