Pune Nashik High Speed Railway : पुणे, अहमदनगर, नासिक या तीन जिल्ह्यांसाठी अति महत्त्वाच्या अशा पुणे-नासिक सेमी हाय स्पीड रेल्वे बाबत एक मोठ अपडेट हाती आल आहे. खरं पाहता मध्य महाराष्ट्रातील हे तीन जिल्हे औद्योगिक दृष्ट्या प्रगत जिल्हे म्हणून ओळखले जातात.
अशा परिस्थितीत, या रेल्वे मुळे या जिल्ह्यातील औद्योगिक विकास हा झपाट्याने होणार असून याचा सर्वाधिक फायदा कृषी क्षेत्राला होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात उत्पादित होणारा शेतमाल पुणेच्या बाजारपेठेत सहजगतीने पोहोचणार आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांचा इनडायरेक्ट फायदा होणार आहे.
एवढेच नाही तर या रूट दरम्यान हजारो प्रवासी रोजाना ये जा करत असतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे अहमदनगर नाशिक सेमी हायस्कूल रेल्वे आनंदाची पर्वणी ठरणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या रेल्वेचे काम संत गतीने सुरू आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने होत नसल्याने लोकसभेत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी याविषयी आवाज उठवला होता.
दरम्यान पुणे जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनामधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, या रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारची एक परवानगी मिळत नसल्याने या मार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. दरम्यान केंद्र शासनाकडून ही परवानगी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे.
निश्चितच पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेचे काम केंद्र शासनाची एक परवानगी मिळत नसल्याने कासवगतीने सुरू आहे. यामुळे ही परवानगी मिळवणे अति आवश्यक आहे. म्हणूनच मग 27 जानेवारी अर्थात शुक्रवारी देवेंद्र फडणवीस अन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव यांची बैठक होणार आहे. निश्चितच या रेल्वेचा परवानगीचा हा तिढा लवकरच सुटेल आणि याच काम जलद गतीने पूर्ण होईल हीच आशा आहे.
दरम्यान पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याच्या एकूण बारा गावांमधून हा रेल्वे मार्ग जाणार असून यापैकी सात गावात मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित गावातही ही प्रक्रिया जोरात सुरू आहे. हवेली तालुक्यातूनही एकूण बारा गावात हा रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे. तालुक्यातील केळगाव या गावातही हा रेल्वे मार्ग प्रस्तावित होता.
मात्र या गावात संरक्षण विभागाचे बॉम्ब निर्मितीचे युनिट असल्याने त्या ठिकाणी रेल्वे नेण्यास लष्कराने आक्षेप घेतला होता यामुळे या गावाला वगळून नवीन अलाइनमेंट तयार करण्यात आले आहे. या नवीन अलाइनमेंट नुसार केळगाव ऐवजी भोसे या गावात हा मार्ग जाणार आहे.