Pune-Nagar Railway : गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय रेल्वेने कात टाकली आहे. भारतीय रेल्वेचा विकास हा बुलेट ट्रेन पेक्षा सुपरफास्ट होतोय. देशातील जो भाग रेल्वेच्या नेटवर्क सोबत जोडला गेलेला नाही तो भाग सुद्धा रेल्वेने जोडण्यासाठी शासन आणि प्रशासन कटिबद्ध आहे. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
तसेच सध्या अस्तित्वात असणाऱ्या रेल्वे मार्गांची क्षमता वाढवण्यासाठी एकेरी ट्रॅक असणारे मार्ग हे दुहेरी बनवले जात आहेत. यामुळे रेल्वेची कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होत आहे. अशातच पुणे ते अहिल्यानगर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून नगर जिल्ह्यातील तीन महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांच्या कामास मंजुरी दिलेली आहे. जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाकांक्षी अशा अहिल्यानगर-पुणे रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिलेली आहे.
यासोबतच आणखी दोन महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. साईनगर (शिर्डी) ते पुणतांबा आणि साईनगर (शिर्डी) ते नाशिक या थेट मार्गासाठीच्या सर्वेक्षणाला देखील केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडून मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आता अहिल्यानगर जिल्ह्यातील या तिन्ही प्रकल्पांच्या कामाला गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त होतोय.
हे तिन्ही प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होतील आणि यामुळे जिल्ह्याच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार असा विश्वास जाणकारांकडून तसेच येथील नागरिकांकडून व्यक्त होतोय. खरे तर या तिन्ही प्रकल्पांचा डीपी हा या प्रकल्पांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याशिवाय होऊ शकत नाही.
म्हणून सर्वेक्षणास मंजुरी मिळाली असल्याने लवकरच हे सर्वेक्षण पूर्ण होईल आणि त्यानंतर डीपीआर चे काम सुरू होईल अशी आशा आहे. मंडळी नाशिक – साईनगर शिर्डी हा रेल्वे मार्ग प्रकल्प 82 किलोमीटर लांबीचा राहणार आहे.
पुणे – अहिल्यानगर १२५ किलोमीटर लांबीचा नवीन दुहेरी ट्रॅक प्रकल्प राहणार आहे आणि साईनगर शिर्डी – पुणतांबा हा रेल्वे मार्ग प्रकल्प १७ किलोमीटर लांबीचा नवीन दुहेरी ट्रॅक प्रकल्प राहील. या तिन्ही रेल्वे प्रकल्पांच्या सर्वेक्षणास नुकतीच मान्यता देण्यात आली आहे, आता हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर डीपीआर तयार केला जाईल.
नक्कीच अहिल्यानगर जिल्ह्यासाठी हे तिन्ही प्रकल्प महत्त्वाचे आहेत आणि हे प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होणे देखील आवश्यक आहे. सरकार देखील हे प्रकल्प फास्टट्रॅक वर पूर्ण करण्यासाठी आग्रही असल्याचे दिसते. यामुळे आता या प्रकल्पांचे काम नियोजित वेळेत सुरू होणार का आणि नियोजित वेळेत हे रेल्वे मार्ग प्रवाशांच्या सेवेत येणार का ही गोष्ट पाण्यासारखी राहणार आहे.