Pune Mumbai Railway News : दरवर्षी ऑगस्ट महिन्यापासून सणासुदीचा हंगाम सुरू होत असतो. यंदाच्या ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाचा मोठा सण साजरा होणार आहे. 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे आणि त्यानंतर 19 ऑगस्टला रक्षाबंधनाचा साजरा होणार आहे. अशा परिस्थितीत, रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या वाढणार आहे.
सणासुदीचा आणि सुट्ट्यांचा कालावधी पाहता रेल्वे प्रवाशांची संख्या आधीच्या तुलनेत अधिक वाढणार असून या पार्श्वभूमीवर रेल्वेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. पुणे, मुंबई अन नागपूर मधील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे विभागाने दोन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
या विशेष एक्सप्रेस ट्रेन पुणे ते नागपूर आणि पुणे ते मुंबई दरम्यान चालवल्या जाणार आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दररोज पुणे ते नागपूर आणि पुणे ते मुंबई दरम्यान हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात.
सणासुदीच्या दिवसात तर या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या आणखी वाढत असते. यामुळे पुणे ते नागपूर आणि पुणे ते मुंबई दरम्यान दोन विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. आता आपण या दोन्ही विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक?
मुंबई ते नागपूर दरम्यान चालवली जाणारी विशेष एक्सप्रेस ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 15 ऑगस्ट ला ००.२५ वाजता सोडली जाणार आहे आणि उपराजधानी नागपूर येथे त्याच दिवशी १५.३० वाजता पोहोचणार आहे.
तसेच नागपूर येथून ही गाडी 16 ऑगस्टला १३.३० वाजता सोडली जाणार आणि LTT मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०४.१० वाजता पोहोचणार आहे.
दुसरीकडे पुणे ते नागपूर दरम्यान चालवली जाणारी विशेष एक्सप्रेस ट्रेन पुणे रेल्वे स्थानकावरून १५ आणि १७ ला १६.१० वाजता सोडली जाणार आहे आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी साडेसहा वाजता पोहोचणार आहे.
तसेच, नागपूर येथून ही विशेष गाडी १४ आणि १६ ऑगस्ट ला १९.४० वाजता सोडली जाईल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.३५ वाजता पोचणार आहे.
कसे असतील थांबे?
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ते नागपूर विशेष एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील ठाणे, कल्याण, नाशिक, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव आणि वर्धा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळणार आहे.
दुसरीकडे नागपूर ते पुणे दरम्यान चालवल्या जाणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाइन आणि उरळी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.