Pune Mumbai Railway : काल लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यात. यामुळे सध्या संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. राजकीय पक्ष आणि राजकीय नेते आगामी निवडणुकीसाठी आत्तापासून सज्ज झाले आहेत. एकंदरीत लोकशाहीचा महाकुंभ आता सजला आहे.
नेते मंडळी आता मतदार राजांकडे आवर्जून जाणार आहेत. दुसरीकडे येत्या काही दिवसात देशात आणि राज्यात होळीचा आणि धुलिवंदनाचा मोठा सण साजरा होणार आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात राहणारी गावाकडची मंडळी पुन्हा एकदा गावाकडे माघारी परतणार आहे.
अनेकजण होळीच्या सणाला आणि धुलीवंदनाला मुंबई आणि पुण्याहून आपल्या गावाकडे जाणार असेल. दरम्यान याच नागरिकांसाठी मध्य रेल्वेने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे.
मध्य रेल्वेने आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांमध्ये वाढणारी गर्दी पाहता काही विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून आणि पुणे रेल्वे स्थानकावरूनही काही विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जाणार आहेत.
रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता मध्य रेल्वे होळी स्पेशल गाड्या चालवणार आहे. या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते दानापूर, सीएसएमटी ते गोरखपूर आणि पुणे ते दानापूर या मार्गांवर विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.
अशा परिस्थितीत आज आपण या विशेष एक्सप्रेस गाडीचे वेळापत्रक अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
सीएसएमटी-दानापूर दरम्यानच्या विशेष गाडीचे वेळापत्रक कसे राहणार ?
मिळालेल्या माहितीनुसार, सीएसएमटी- दानापूर विशेष एक्सप्रेस ट्रेन २१ मार्च रोजी सीएसएमटी येथून सकाळी ११.२५ ला रवाना होईल आणि दानापूरला दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजता पोहचणार आहे.
तसेच दानापूर-सीएसएमटी ट्रेन २२ मार्चला दानापूर येथून संध्याकाळी ७.३० सुटणार आहे आणि सीएसएमटीला मध्यरात्री ३.५० वाजता पोहचणार आहे.
सीएसएमटी- गोरखपूर दरम्यानच्या विशेष गाडीचे वेळापत्रक कसे राहणार ?
सीएसएमटी- गोरखपूर विशेष एक्सप्रेस ट्रेन २२ मार्चला सीएसएमटी येथून रात्री १०.३५ वाजता रवाना होईल आणि गोरखपूरला तिसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता पोहचणार आहे. तसेच, गोरखपूर-सीएसएमटी विशेष एक्सप्रेस ट्रेन २४ मार्चला गोरखपूर येथून दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे तिसऱ्या दिवशी रात्री १२.४० वाजता पोहचणार आहे.
पुणे-दानापूर दरम्यानच्या विशेष गाडीचे वेळापत्रक कसे राहणार
पुणे-दानापूर-पुणे २१ मार्चला पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी ६.३० वाजता सुटेल आणि दानापूरला दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४० वाजता पोहचणार आहे. तसेच, दानापूर-पुणे-दानापूर ही ट्रेन २२ मार्चला दानापूर येथून दुपारी १.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७.४५ वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.