Pune Modi Awas Yojana : राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील गरजू व्यक्तींसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. ज्या नागरिकांना अजूनही स्वतःचे पक्के घर नाही अशा नागरिकांसाठी घरकुल योजना देखील राबवल्या जात आहेत.
यात अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी शबरी आवास योजना, अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी रमाई आवास योजना याशिवाय प्रधानमंत्री आवास योजना अशा योजना महाराष्ट्रात सुरू आहेत.
मात्र ओबीसी प्रवर्गातील नागरिकांसाठी अजूनही घरकुल योजना सुरू झालेली नव्हती. यामुळे राज्य शासनाने मोठा निर्णय घेत मोदी आवास योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत राज्यातील ओबीसी समाजातील पात्र नागरिकांना घरकुल उपलब्ध होणार आहे.
दरम्यान याच योजनेबाबत पुणे जिल्ह्यातून एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात मोदी आवास योजनेअंतर्गत 1521 घरांचे उद्दिष्टे ठेवण्यात आले होते.
विशेष म्हणजे यापैकी 1421 घरांना नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे ओबीसी प्रवर्गातील हजारो नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दरम्यान आता आपण या योजनेसाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे इत्यादींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मोदी आवास योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशांना मिळणार आहे.
राज्यातील फक्त ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना मोदी आवास योजनेचा लाभ मिळेल.
लाभार्थी महाराष्ट्रात किमान 15 वर्ष वास्तव्यास असणे आवश्यक आहे.
लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.
लाभार्थ्याकडे स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ ज्या लाभार्थ्याकडे पक्के घर नाही अशाच लाभार्थ्यांना दिले जाणार आहे. ज्यांच्याकडे पक्के घर असेल त्यांना याचा लाभ मिळणार नाही.
यापूर्वी लाभार्थ्याने कोणत्याच घरकुलाचा लाभ घेतलेला नसावा. ज्यांनी आधीच घरकुलाचा लाभ घेतलेला असेल त्यांना देखील या योजनेतून वगळले जाणार आहे.
पीएम आवास योजनेच्या प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या लोकांना याचा लाभ मिळणार नाही. यामुळे जर तुम्ही पीएम आवास योजनेसाठी अर्ज केलेला असेल आणि तुमचे नाव पीएम आवास योजनेच्या प्रतीक्षा यादीत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
एकदा मोदी आवास योजनेचा लाभ मिळाला की भविष्यात त्या लाभार्थ्याला पुन्हा घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही.
कोण-कोणती कागदपत्रे लागतात
मोदी आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यात अर्जदाराचा सातबारा उतारा, मालमत्ता नोंदपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत, ग्रामपंचायतमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा अथवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, वीजबिल, मनरेगा जॉबकार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचे फोटो, मोबाईल क्रमांक असे महत्त्वाचे कागदपत्र या योजनेच्या लाभासाठी आवश्यक असतात.