Pune Mhada News : गेल्या काही वर्षांमध्ये पुणे सोलापूर कोल्हापूर सांगली सारख्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच शहरांमध्ये घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. या भागात घरांच्या किमती दिवसेंदिवस वधारत असल्याने सर्वसामान्यांचे घर खरेदीचे स्वप्न लांबणीवर पडत आहे. अशा या परिस्थितीत म्हाडाच्या विविध विभागीय मंडळाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या परवडणाऱ्या घरांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आधार मिळत आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुंबई मंडळाने 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती, याची संगणकीय सोडत देखील मंडळाच्या माध्यमातून नुकतीच काढण्यात आली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळानंतर आता पुणे मंडळाने देखील हजारो घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे मंडळांनी 6,294 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. त्यासाठीची अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुणे विभागीय मंडळाच्या या सोडती मध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील घरांचा समावेश आहे.
या पुणे मंडळाच्या लॉटरी साठी आजपासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली असून पाच डिसेंबर 2024 ला याची संगणकीय सोडत काढली जाणार आहे. दरम्यान आता आपण या संपूर्ण लॉटरीचे वेळापत्रक नेमके कसे आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पुणे मंडळाच्या लॉटरी चे संपूर्ण वेळापत्रक खालील प्रमाणे
जाहिरात अन अर्ज विक्री तसेच स्वीकृतीची प्रक्रिया : 10 ऑक्टोबरला जाहिरात काढण्यात आली असून यासाठीची अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया आजपासूनच सुरू झाली आहे.
ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा अंतिम दिनांक : 12 नोव्हेंबर, 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता ऑनलाइन अर्ज नोंदणी अर्ज भरणा प्रक्रिया संपणार आहे.
ऑनलाइन अनामत रक्कम भरण्यासाठीची मुदत : ऑनलाइन अनामत रक्कम भरण्यासाठी 12 नोव्हेंबर, 2024 रोजी रात्री 11.59 पर्यन्त मुदत देण्यात आली आहे.
RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणासाठीची मुदत : 13 नोव्हेंबर,2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे.
प्रारूप यादी कधी निघणार : 23 नोव्हेंबर, 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता
हरकती नोंदवण्यासाठी अंतिम मुदत : 27 नोव्हेंबर, 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपल्या हरकती नोंदविता येणार आहेत.
अंतिम यादी कधी प्रसिद्ध होणार : 30 नोव्हेंबरला या घरांसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांपैकी पात्र अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
सोडत कधी निघणार : 5 डिसेंबर 2024 ला पुणे मंडळाच्या घरांसाठी सोडत निघणार आहे.