Pune Mhada News : पुण्यात आपलं एक हक्काचं घर असावं असं स्वप्न असणाऱ्यांची संख्या फार अधिक आहे, पण प्रत्येकाचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. अलीकडे निवासी मालमत्तेच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पुण्यासारख्या शहरांमध्ये तर घरांच्या किमती अगदीच आकाशाला गवसणी घालत आहेत.
हेच कारण आहे की पुणे आणि परिसरात जर हक्काचे घर हवे असेल तर अनेकजण म्हाडाच्या घरांची वाट पाहत असतात. म्हाडा पुणे मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी हजारो घरांसाठी लॉटरी काढली जात असते.
दरम्यान पुणे मंडळाने गेल्या वर्षी हजारो घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. पुणे बोर्डाने तब्बल 6,240 घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती आणि या सोडतीसाठी अर्ज भरण्याची मुदत नुकतीच संपली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या सोडते साठी 93 हजार 662 लोकांनी अर्ज सादर केले आहेत. या सोडतीची गेल्या अनेक महिन्यांपासून वाट पाहिली जात होती यामुळे नागरिकांनी या सोडतीला चांगला प्रतिसाद दाखवला.
या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी तब्बल ११३ कोटी १७ लाख ९५ हजार २८० रुपयांची अनामत रक्कम सुद्धा भरलेली आहे. महत्त्वाची बाब अशी की, अनामत रकमेचा हा आकडा म्हाडाच्या इतिहासातील सर्वाधिक आहे.
यावरूनच म्हाडाच्या या लॉटरीला नागरिकांनी किती प्रतिसाद दाखवलाय हे अधोरेखित होत आहे. पुणे आणि परिसरातील घरांची वाढती मागणी आणि म्हाडाच्या घरांवरील लोकांचा विश्वास यातून स्पष्टपणे दिसून येतो.
दरम्यान म्हाडाच्या या घरांच्या प्रत्यक्षात संगणकीय सोडते बाबत बोलायचं झालं तर ही सोडत 28 जानेवारीला निघणार आहे. म्हणजेच 28 जानेवारीला प्रत्यक्षात या घरांसाठी अर्ज सादर केलेल्या अर्जदारांपैकी कोणाला घर मिळतं हे ठरणार आहे.
विजयी ठरलेल्या अर्जदारांना लॉटरी निघाल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी घराचा ताबा दिला जाणार आहे आणि ज्यांचा लॉटरीमध्ये नंबर लागणार नाही त्यांना त्यांची अनामत रक्कम परत केली जाणार आहे. लॉटरी निघाल्यानंतर अवघ्या काही दिवसांच्या काळातच अर्जदारांची अनामत रक्कम म्हाडा पुणे मंडळाच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे.