Pune Mhada News : पुणे मंडळातील 6058 घरांच्या सोडत संदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे. वास्तविक पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या महानगरात स्वतःचं घर असण हे कित्यकांच स्वप्न असतं. पण या महानगरांमध्ये दिवसेंदिवस घरांच्या किमती आकाशाला गवसणी घालत आहेत.
वाढलेली महागाई, वाढती लोकसंख्या, शहरात उपलब्ध असलेल्या कमी जागा या सर्व पार्श्वभूमीवर घराच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोक म्हाडाचा परवडणाऱ्या घरांची कायमच वाट पाहतात. नुकतीच पुणे मंडळांतर्गत सहा हजार 58 घरांसाठी सोडत करण्यात आली. यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात आली.
हे पण वाचा :- मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर ! म्हाडाच्या मुंबई मंडळातील घर सोडतसंदर्भात समोर आली ‘ही’ मोठी बातमी
या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेच्या माध्यमातून या 6058 घरांसाठी तब्बल 58 हजार 467 लोकांनी अनामत रक्कम भरून आपला अर्ज सादर केला आहे. अर्ज सादर झाला मात्र पुणे मंडळातील या म्हाडाच्या लॉटरीला मुहूर्त लागत नव्हता. तारीख पे तारीख दिली जात होती. परंतु आता या संदर्भात मोठी माहिती हाती आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे मंडळातील 6,058 घरांची सोडत सोमवारी म्हणजेच 20 मार्च 2023 रोजी काढली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे ही सोडत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काढली जाणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.
हे पण वाचा :- भारतीय रेल्वेचा मेगा प्लान! 20 हजार कोटी खर्चून 102 ‘वंदे भारत एक्सप्रेस’ तयार करणार; कोणत्या रूटवर धावणार? पहा…..
ही सोडत मात्र ऑनलाईन पद्धतीने काढली जाणार आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ही सोडत उपमुख्यमंत्री कार्यालय महाराष्ट्र राज्य या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे ऑनलाइन पध्दतीने काढली जाणार आहे. तसेच ऑनलाइन सोडतीचा कार्यक्रम हा पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, गृहनिर्माण भवन, आगरकर नगर, पुणे- 1 येथे होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुणे मंडळांतर्गत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेअंतर्गत 2938, 20% योजनेअंतर्गत 2483, पीएम आवास योजनेचे 637 घरे अशा एकूण सहा हजार 58 घरांची ही सोडत काढली जाणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांना रेल्वे बोर्ड लवकरच देणार मोठी भेट ! शहरात अन उपनगरात आता ‘या’ वंदे भारत ट्रेन धावणार