Pune Metro : गेल्या काही वर्षांमध्ये पुणे शहरातील मेट्रोचा विस्तार झपाट्याने झाला आहे. दरम्यान उद्या पुण्यातील एका नवीन मेट्रो मार्गाचे उद्घाटन होणार आहे. यामुळे आता शहरातील नागरिकांचा प्रवास आणखी जलद होणार आहे. सिविल कोर्ट म्हणजेच जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यान चा संपूर्ण भूमिगत मेट्रो मार्ग आता वाहतुकीसाठी सुरू होणार आहे.
याचे उद्घाटन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याचे उद्घाटन उद्या अर्थातच 29 सप्टेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः करणार असल्याची बातमी हाती आलेली आहे.
यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक असणारी सर्व पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे. खरे तर याचे उद्घाटन गुरुवारी केले जाणार होते. मात्र पुण्यात झालेल्या जोरदार पावसामुळे उद्घाटन सोहळा रद्द झाला.
गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येऊन या मार्गाचे उद्घाटन करणार होते. मात्र ऐनवेळी झालेल्या जोरदार पावसामुळे पंतप्रधान महोदय यांचा पुणे दौरा रद्द झाला आणि यामुळे या मार्गाचे उद्घाटन देखील लांबणीवर पडले.
मात्र आता या मार्गाच्या उद्घाटनाला मुहूर्त सापडला असून उदयाचे उद्घाटन होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण जिल्हा न्यायालय ते स्वारगेट यादरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना किती तिकीट काढावे लागणारे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
किती राहणार तिकीट?
सिविल कोर्ट ते स्वारगेट यादरम्यानचा मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. ही मेट्रो सेवा उद्यापासून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल. या मार्गावर गर्दीच्या वेळी प्रत्येक सात मिनिटांनी आणि कमी गर्दीच्या वेळी प्रत्येक दहा मिनिटांनी मेट्रो चालवली जाणार आहे.
यामुळे सिविल कोर्ट ते स्वारगेट दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर आता पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट दरम्यान थेट मेट्रो ने प्रवास करता येणार आहे. यामुळे स्वारगेट व आजूबाजूच्या परिसरातील विकासाला खऱ्या अर्थाने नवीन स्वरूप आणि चालना मिळणार आहे.
यामुळे या भागातील प्रवाशांच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला जात आहे. स्वारगेट ते जिल्हा न्यायालय मेट्रो सुरू होणार असल्याने पिंपरी चिंचवड, रामवाडी आणि वनाज परिसरातून शहराच्या मध्यवर्ती भागात येणार्या प्रवाशांची विनाविलंब सोय होणार असल्याचा दावा प्रशासनाच्या माध्यमातून केला जातोय.
ऐन सणासुदीच्या काळातच पुण्यातील हा मेट्रो मार्ग सुरू होईल अन पुणेकरांना याचा मोठा फायदा होईल अशी आशा आहे. यामुळे पुण्यातील पहिल्या टप्प्यातील वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट हे दोन मेट्रो मार्ग पूर्णपणे कार्यान्वित होणार आहेत.
पुणे मेट्रोच्या तिकीट दराबाबत बोलायचं झालं तर पीसीएमसी ते स्वारगेट- ३० रुपये, वनाज ते स्वारगेट – २५ रुपये, रामवाडी ते स्वारगेट – ३५ रुपये एवढे तिकीट काढावे लागणार आहे. तसेच, स्वारगेट पासून मंडई अवघ्या दहा रुपयांत आणि जिल्हा न्यायालयापासून मंडई स्थानकापर्यंतचा प्रवासासाठी पंधरा रुपये खर्च येणार आहे.