Pune Metro News : पुणेकरांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आज शिंदे सरकारने पुणेकरांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पुणेकरांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा मेट्रो संदर्भातील आहे. राज्य मंत्रिमंडळाने पुण्यातील दोन नवीन मेट्रो मार्गाला मंजुरी दिली आहे.
अर्थातच आता पुण्याला आता दोन नवीन मेट्रो मार्ग मिळणार आहेत. खरंतर भारतीय निवडणूक आयोग लवकरच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा करणार आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार उद्या भारतीय निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. दरम्यान या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज शिंदे सरकारने एक महत्त्वाची राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली होती.
या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत. पुणे शहरातील आणखी दोन मेट्रो मार्गांना देखील या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
या नव्या मेट्रो मार्गांमुळे पुणेकरांचा प्रवास आणखी जलद होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या पुणे शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांवर मेट्रो सुरू आहे.
महत्त्वाचे म्हणजे आता लवकरच पुण्याला दोन नवीन मेट्रो मार्ग मिळणार असून या मेट्रो मार्गांना आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
दरम्यान आज आपण राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या या दोन नव्या मेट्रो मार्गाचे रूट कसे असतील या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे असणार नवे मार्ग ?
आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी आणि नळस्टॉप-डहाणूकर कॉलनी-वारजे-माणिकबाग या दोन मार्गांना मंजुरी दिली आहे.
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या 2 मार्गांसाठी 9 हजार 897 कोटी रुपयांच्या निधीला सुद्धा मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. या दोन्ही मेट्रो मार्गाची लांबी ही 31.63 किमी एवढी राहणार आहे.
या मेट्रो मार्गावर 28 स्थानक विकसित केले जाणार आहेत. या प्रस्तावित नव्या मेट्रो मार्गामुळे पुणे शहरातील मेट्रोचे जाळे हे आणखी विस्तारणार आहे आणि यामुळे शहरातील नागरिकांचा प्रवास नक्कीच सुलभ आणि अतिशय जलद होईल अशी आशा आहे.