Pune Metro News : पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. यामुळे पुणेकरांना मोठा अडचणींचा सामना करावा लागतोय. हेच कारण आहे की पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे.
पुण्यातील नागरिकांनी खाजगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतूकीचा अधिकाधिक वापर करावा यासाठी शहरात मेट्रोचे जाळे विणले जात आहेत. पुण्याप्रमाणेच नागपूर आणि मुंबईमध्ये देखील वाहतूक कोंडीची समस्या मोठी गंभीर बनली आहे.
यामुळे नागपूर आणि मुंबईमध्ये देखील मेट्रोचे जाळे विणले जात आहे. दरम्यान आता पुणे मेट्रो संदर्भात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
खरंतर, नुकत्याच दोन दिवसांपूर्वी अर्थातच रविवारी पुण्यातील सिविल कोर्ट ते स्वारगेट या विस्तारित मेट्रो मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. या मेट्रो मार्गाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हे उद्घाटन आयोजित करण्यात आले होते. या उद्घाटन सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे पुण्यात उपस्थित होते.
यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रोचे वेगळेपण स्पष्ट केले. फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे, पुणे मेट्रोचे काम २०१४ साली सुरु झाले. पण, या प्रकल्पाच्या कामाला खऱ्या अर्थाने आपले सरकार आल्यावर गती मिळाली आहे.
आपले सरकार आल्यानंतर पुणे मेट्रोसाठी कंपनी स्थापन करण्यात आली आहे. पुणे मेट्रोचे काम अत्यंत वेगाने सुरु करण्यात आले. यामुळे पुणे शहरातील मेट्रोचे काम रेकॉर्ड वेळेत पूर्ण होऊ शकले. देशातील सर्वात वेगाने काम पूर्ण होण्याचा मान पुणे मेट्रोच्या पहिला टप्पाला मिळाला आहे.
मेट्रो शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो ही देशातील पहिली टीटीपी मोडची मेट्रो आहे. सर्वच पद्धतीने विचार करुन पुण्यातील वाहतूक मॅनेज करण्याचे काम या ठिकाणी झाले असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
यावेळी फडणवीस यांनी पुण्यातील विस्तारीत मेट्रो वाघोली, चांदणी चौक आणि इतर भागांत होत असल्याची माहिती दिली आहे. यामुळे भविष्यात पुण्यातील कोणत्याही टोकापासून कोणत्याही टोकापर्यंत मेट्रोने प्रवास करता येईल अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
पुणे शहर मेट्रोने इन्ट्रीग्रेट होणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. म्हणजेच भविष्यात पुणे शहरातील मेट्रोचे जाळे आणखी स्ट्रॉंग बनणार आहे. त्यामुळे पुण्यातील कोणत्याही भागात प्रवास करायचा असेल तर सहजतेने मेट्रो उपलब्ध होणार आहे.