Pune Metro : पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून जगात ख्याती प्राप्त आहे. एकेकाळी पुणे शहर वाहतुकीसाठी शिस्तप्रिय शहर म्हणून ओळखले जात. पण वाढतं औद्योगिकीकरण, शिक्षणासाठी शहरात दाखल होत असलेल्या हजारोंच्या संख्येने विद्यार्थी, वाहनांची वाढती लोकसंख्या, झपाट्याने उभारण्यात आलेल्या मोठमोठ्या आयटीच्या कंपन्या या सर्वांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक कोंडीसाठी आता ओळखले जाऊ लागले आहे.
मुंबई प्रमाणेच पुण्यामध्ये देखील वाहतूक कोंडी ही एक मोठी समस्या बनू पाहत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरांमध्ये वेगवेगळे रस्ते विकासाचे कामे केली जात आहेत. सोबतच मेट्रो मार्ग देखील पुण्यामध्ये विकसित होत आहेत. दरम्यान आता शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू पाहणाऱ्या पुणे मेट्रोबाबत मोठी माहिती समोर आली आहे. ही माहिती समोर आली आहे ती शहरातील दुसऱ्या मेट्रोमार्ग प्रकल्पाबाबत म्हणजे शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो मार्ग प्रकल्पाबाबत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा मेट्रो मार्ग प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्त्वावर उभारला जात आहे. म्हणजेच एका खाजगी कंपनीला या प्रकल्पाचे काम देण्यात आले असून पुढील 35 वर्ष आज कंपनीला हा मेट्रो मार्ग चालवण्यासाठी दिला जाणार आहे. दरम्यान या मेट्रोमार्ग प्रकल्पाला आता गती मिळाली आहे. वास्तविक या मेट्रो मार्गाचे काम आता जलद गतीने पूर्ण व्हावे अशी प्रवाशांची इच्छा आहे.
त्या दृष्टीने आता या प्रकल्पाचे काम जलद गतीने सुरू झाले आहे. हा मार्ग 23 किलोमीटर लांबीचा असून या प्रकल्प अंतर्गत आत्तापर्यंत 440 खांब तयार करण्यात आले आहेत. तसेच बाणेर बालेवाडी व अन्य काही ठिकाणी असा दोन किलोमीटरचा रेल्वे मार्ग देखील प्राथमिक स्वरूपात तयार झाल्याची माहिती एका मीडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे.
हे पण वाचा :- मुंबईवासियांसाठी महत्वाची बातमी! कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ‘या’ महिन्यात होणार सुरु; ‘या’ रेल्वे स्थानकावर थांबणार, पहा…..
जसं की आपणास ठाऊकच आहे हिंजवडी आयटी पार्क मध्ये कामाला येणाऱ्या नागरिकांना रस्ते मार्गे कामावर जावे लागते. यामुळे या लोकांना वाहतूक कोंडीचा फटका बसतो. त्यांचा बहुतांशी वेळ हा प्रवासातच जातो. हेच कारण आहे की, हा मेट्रो मार्ग प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. आता या मेट्रो मार्ग प्रकल्पाच्या 900 खांबा पैकी 440 खांब तयार झाले आहेत. शिवाय दोन किलोमीटर पर्यंतचा प्राथमिक स्वरूपाचा मेट्रो मार्ग तयार झाला आहे.
यामुळे या प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकल्प 2025 पर्यंत संबंधित खाजगी कंपनीच्या माध्यमातून तयार करून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. निश्चितच हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर याचा हिंजेवाडी आयटी पार्क मध्ये कामाला जाणाऱ्या नोकरदार वर्गाला सर्वाधिक बेनिफिट होणार आहे.
हे पण वाचा :- अहमदनगर, नाशिक, पुणे, अहमदनगर, संभाजीनगर जिल्ह्यात आजही पाऊस पडणार का? कसं राहणार महाराष्ट्राचं हवामान, पहा