Pune Local Railway News : पुणे शहरात प्रवासासाठी पीएमपीएलच्या बसेस आणि रेल्वेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पी एम पी एल ची बस, मेट्रो सेवा आणि लोकल सेवा हे पुण्यातील नागरिकांसाठी प्रवासाचे महत्त्वाचे साधन आहे.
पुण्यातील लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरे तर आज पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे ते लोणावळा दरम्यान काही महत्त्वाच्या कामांसाठी मेगाब्लॉक आयोजित केला आहे. यामुळे या मार्गांवरील पुणे लोणावळा लोकलच्या 14 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
यामुळे आज लोकलने प्रवास करणाऱ्या पुणेकरांना मोठा फटका बसणार आहे. काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असल्याने या मार्गावरील प्रवाशांना आज थोडासा मनस्ताप सहन करावा लागू शकतो.
दरम्यान आता आपण पुणे-लोणावळा लोकलच्या कोणत्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत ? याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या लोकल राहणार रद्द
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे मार्गावरील काही महत्त्वाच्या कामासाठी घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे आज 21 जानेवारी 2024 रविवारी पुण्याहून लोणावळ्यासाठी 9:17, 11:17, 3:00, 4:25, 6:02 वाजता सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे.
तसेच शिवाजीनगर येथून तळेगावसाठी दुपारी तीन वाजून 47 मिनिटांनी आणि पाच वाजून वीस मिनिटांनी सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे.
याशिवाय लोणावळा येथून शिवाजीनगर कडे सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी, सायंकाळी साडेपाच वाजता, सहा वाजून आठ मिनिटांनी, सात वाजून 35 मिनिटांनी सुटणारी लोकल रद्द करण्यात आली आहे.
लोणावळा येथून पुण्यासाठी दुपारी दोन वाजून 50 मिनिटांनी आणि संध्याकाळी सात वाजता सुटणारी लोकल गाडी रद्द करण्यात आली आहे.
तळेगाव येथून पुण्यासाठी सायंकाळी चार वाजून 40 मिनिटांनी सुटणारी लोकल देखील आज रद्द राहणार आहे. यामुळे प्रवाशांना या कालावधीत जर प्रवास करायचा असेल तर इतर पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा वापर या ठिकाणी करावा लागणार आहे.