Pune Local Railway News : पुणे शहरात लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. खरंतर पुणे शहरात आणि उपनगरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे खाजगी वाहनांचा वापर वाढत आहे. पण खाजगी वाहनांचा वापर पर्यावरणासाठी घातक आहे.
त्यामुळे खाजगी वाहनांचा वापर कमी व्हावा आणि सार्वजनिक वाहतूकीचा वापर वाढावा यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्न केले जात आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. याशिवाय लोकलने प्रवास वाढावा यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत.
पुणे शहरात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. विशेष म्हणजे या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. अशा परिस्थितीत लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे रेल्वे मंडळांने एक अतिशय महत्त्वाचा आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. सध्या पुणे रेल्वे स्थानकावरून पुणे ते लोणावळा दरम्यान लोकल चालवली जात आहे.
ही लोकल पुणे रेल्वे स्थानकावरून सुटते मात्र यामुळे स्थानकावर दिवसेंदिवस ताण वाढत आहे. स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. म्हणून ही गर्दी कमी करण्यासाठी आणि लोकलने प्रवास करणाऱ्या तसेच पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांसाठी पुणे रेल्वे मंडळाने लोकलसाठी पर्यायी टर्मिनल्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे मुख्य स्थानकावरील भार कमी होणार असा दावा केला जात आहे. एवढेच नाही तर मुख्य स्थानकावरून म्हणजेच पुणे स्थानकावरून नवीन रेल्वे सुरू होण्यासाठी देखील संधी उपलब्ध होणार आहे. तसेच लोकलसाठी स्पेशल टर्मिनल तयार झाले तर लोकलची संख्याही वाढणार आहे.
कुठे उभारले जाणार टर्मिनल
मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेची पुणे रेल्वे स्थानकाजवळ जागा आहे. मुख्य स्थानकाजवळील संगम पूल येथे रेल्वेची जागा आहे. या रेल्वेच्या जागेवर आता लोकलसाठी टर्मिनल तयार केले जाणार आहे. यासाठी मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनकडून जागा देखील निश्चित करण्यात आली असून त्यासाठी ड्रोनद्वारे छायाचित्रण करण्यात आले असल्याची माहिती टीव्ही 9 या वृत्तसंस्थेने दिली आहे.
सध्या पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या 34 फेऱ्या चालवल्या जात असून या सर्व फेऱ्या या नवीन टर्मिनल वरून धावणार आहेत. नवीन टर्मिनलवरुन फक्त लोकल गाड्या सुटणार आहेत. निश्चितच या नवीन टर्मिनलमुळे मुख्य स्थानकावरील भार कमी होणार आहे.
यामुळे लोकलच्या फेऱ्या देखील वाढवल्या जाऊ शकतात असेही मत जाणकार लोकांकडून व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे हे नवीन टर्मिनल विकसित करण्यासाठी 5,200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.