Pune Local News : पुणेकरांसाठी एक मोठी बातमी आहे. ही बातमी आहे पुणेकरांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा लोकल संदर्भात. खरंतर, पुण्यात सध्या स्थितीला शिवाजीनगर ते लोणावळा या मार्गावर लोकल सुरू आहे. मात्र, सध्या या मार्गावर दुपारी लोकल धावत नाहीये.
कोरोनापूर्वी या मार्गावर दुपारी सुद्धा लोकल धावत होती. पण कोरोनानंतर या मार्गावरील दुपारची लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. याचा मात्र या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसत आहे.
या मार्गावर दुपारच्या वेळी मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आणि विद्यार्थी प्रवास करत असतात. पण दुपारी लोकल नसल्याने विद्यार्थ्यांना, कामगारांना तसेच पर्यटकांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
परिणामी या मार्गावरील प्रवाशांनी पुन्हा एकदा दुपारची लोकलसेवा सुरू झाली पाहिजे अशी मागणी लावून धरली. प्रवाशांची हीच मागणी लक्षात घेता मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे विभागाकडे याबाबत पाठपुरावा सुरू केला.
दरम्यान, खासदार महोदय यांचा हा पाठपुरावा आता यशस्वी झाला आहे. कारण की, उद्या अर्थातच 31 जानेवारी 2024 पासून या मार्गावर दुपारी देखील लोकल धावू शकणार आहे.
दुपारच्या लोकल सेवेला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवला जाणार अशी माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून समोर आली आहे.
खरंतर, या मार्गावर दुपारी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय आधीच झालेला आहे. पण, ही लोकल सेवा केव्हा सुरू होणार हा मोठा सवाल होता.
आता मात्र उद्यापासून या मार्गावर लोकल धावणार असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. या मार्गावरील प्रवाशांना आता दुपारी देखील जलद गतीने प्रवास करता येणार आहे.
यामुळे प्रवाशांच्या वेळेची आणि पैशांची बचत होणार आहे. दरम्यान या दुपारच्या लोकल सेवेच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर शिवाजीनगर स्थानकावरून दुपारी 12.05 वाजता लोकल सुटणार आहे आणि दुपारी 01.20 वाजता लोणावळा स्थानकावर पोहोचणार आहे.
तसेच, लोणावळा स्थानकावरून सकाळी साडेअकरा वाजता लवकर सुटणार आहे आणि दुपारी पाऊण वाजता शिवाजीनगर येथे पोहोचणार आहे.