Pune Kanda Anudan : अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर समवेतच राज्यातील एकूण 23 जिल्ह्यात कांद्याची लागवड केली जाते. कमी अधिक प्रमाणात राज्यातील 23 जिल्ह्यात कांदा या नगदी पिकाची शेती होते. एकंदरीत राज्यातील 70 ते 80% किंवा त्याहून अधिक शेतकरी हे कांदा पिकावर अवलंबून आहेत.
मात्र असे असले तरी हे पीक अनेकदा शेतकऱ्यांसाठी डोईजड सिद्ध होते. याचे कारण म्हणजे बाजारातील लहरीपणा. अनेकदा बाजारात कांद्याला चांगला भाव मिळत नाही यामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला उत्पादन खर्च देखील भरून काढता येत नाही. अशीच परिस्थिती फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात देखील पाहायला मिळाली होती.
या दोन्ही महिन्यात कांद्याला मात्र दोन ते तीन रुपये प्रति किलो असा भाव मिळाला होता. अशा परिस्थितीत त्यावेळी शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांनी कांद्याला अनुदान देण्याची मागणी केली होती. विविध शेतकरी संघटनांनी आणि राजकीय नेत्यांनी या मागणीसाठी शासनावर दबाव बनवला होता.
या दबावामुळे शिंदे फडणवीस सरकारने एक फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 दरम्यान विक्री केलेल्या कांद्याला 350 रुपये प्रति क्विंटल प्रति शेतकरी 200 क्विंटलच्या मर्यादेत अनुदान जाहीर केले. अनुदानाची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाली मात्र अजूनही शासनाने अनुदानाचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात वळता केलेला नाही.
मात्र येत्या काही दिवसात हा पैसा खात्यात जमा होणार आहे. अनुदानासाठी आवश्यक असलेले 844 कोटी पैकी पहिल्या टप्प्यात 466 कोटी रुपयाची रक्कम राज्याच्या वित्त विभागाने पणन विभागाकडे हस्तांतरित केली आहे. ही रक्कम आता पणन विभाग राज्यातील 23 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना देऊ करणार आहे.
यामध्ये जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या तीन लाख पंधरा हजार 644 क्विंटल कांद्याला अनुदान मिळणार आहे. यासाठी अकरा कोटी चार लाख 75 हजार 651 रुपयाची रक्कम मंजुर झाली आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांपैकी चार हजार 562 कांदा उत्पादक अनुदानासाठी पात्र ठरले आहेत.
जुन्नर एपीएमसीच्या सभापतींनी ही माहिती दिली असून सभापती महोदय यांनी आता लवकरच कांदा उत्पादकांना अनुदानाची रक्कम मिळेल असे सांगितले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 1 फेब्रुवारी ते दिनांक 31 मार्च 2023 या कालावधीत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जुन्नर, ओतूर, आळेफाटा, नारायणगाव बाजार आवारात कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांपैकी 4 हजार 562 कांदा उत्पादक शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले आहेत.
या साडेचार हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी या कालावधीत 3 लाख 15 हजार 644 क्विंटल कांद्याची विक्री केली होती. आता या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये याप्रमाणे 11 कोटी 4 लाख 75 हजार 561 रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. ही अनुदानाची रक्कम लवकरच शासनाच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.