Pune Hubali Vande Bharat Express : पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. या वंदे भारत ट्रेनला एक अतिरिक्त थांबा मंजूर करण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की ही वंदे भारत ट्रेन नुकत्याच काही दिवसांपूर्वी सुरू झाली आहे.
पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद या तीन गाड्या एकाच दिवशी सुरू करण्यात आल्या होत्या. या तिन्ही गाड्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला होता.
यातील पुणे ते हुबळी वंदे भारत ट्रेन बाबत बोलायचं झालं तर आता या गाडीला घटप्रभा या रेल्वेस्थानकावर नवीन थांबा मंजूर करण्याचा मोठा निर्णय रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आला असून याचा घटप्रभा स्थानकाजवळ असणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.
पण, हा थांबा ट्रायल बेसिस वर राहणार आहे म्हणजेच प्रायोगिक थांबा राहील. भारतीय रेल्वेने ट्रेन क्र. 20669/20670 म्हणजे पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेसला कर्नाटकातील बेळगावी येथील घटप्रभा रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाची अंमलबजावणी तीन जानेवारीपासून होणार आहे.
3 जानेवारी ते 30 जून 2025 या कालावधीत हा थांबा मंजूर राहणार आहे. म्हणजेच या कालावधीत पुणे ते हुबळी ही गाडी घटप्रभा रेल्वे स्थानकावर सुद्धा थांबा घेणार आहे. घटप्रभा रेल्वे स्थानकावरून जर वंदे भारत ट्रेन ला चांगला प्रतिसाद मिळाला तर प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेला हा थांबा आगामी काळात कंटिन्यू देखील केला जाऊ शकतो.
ही वंदे भारत एक्स्प्रेस पुणे, कोल्हापूर, सांगली आणि धारवाडसह प्रदेशातील प्रमुख शहरांना जोडते. ही गाडी धारवाड, बेलगावी, मिरज आणि कराड या रेल्वे स्थानकावर थांबा घेते मात्र 3 जानेवारीपासून ही गाडी घटप्रभा रेल्वे स्थानकावर देखील थांबणार आहे.
घटप्रभा येथील प्रायोगिक थांब्यामुळे प्रवाशांना प्रवासाचा सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे. पुणे ते हुबळी हे 558 किलोमीटरचे अंतर ही वंदे भारत ट्रेन अवघ्या साडेआठ तासात पूर्ण करते. यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास हा अधिक वेगवान झाला आहे.