Pune Highway Toll News : पुणे, नाशिक आणि सातारकरांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे नवीन आर्थिक वर्षात आता येथील प्रवाशांचा प्रवास महाग होणार आहे. कारण की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दोन महामार्गांवरील टोलच्या दरात मोठी वाढ केली आहे.
जर तुम्ही पुणे ते नाशिक किंवा पुणे ते सातारा दरम्यान प्रवास करत असाल तर तुम्हाला आता वाढीव टोल भरावा लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक आणि पुणे-सातारा या राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना आता अधिकचा टोल भरावा लागणार आहे. एक एप्रिल पासून या महामार्गांवरील टोलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय एन एच आय ने घेतलेला आहे.
दरम्यान आता आपण या महामार्गांवर प्रवास करण्यासाठी आता एक एप्रिल पासून किती टोल भरावा लागणार आहे, टोलच्या दरात नेमकी किती वाढ झाली आहे हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पुणे-सातारा महामार्गावर आता किती टोल भरावा लागणार
खरंतर पुणे ते नाशिक आणि पुणे ते सातारा या महामार्गाने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. आता मात्र या महामार्गांवरील प्रवास मागणार आहे. महामार्गांवरील टोल दरात वाढ करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नुकताच घेतलेला आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी मात्र एक एप्रिल 2024 पासून होणार आहे. पुणे सातारा महामार्गाबाबत बोलायचं झालं तर या महामार्गावर खेड शिवापुर आणि आनेवाडी या ठिकाणी टोलनाके बसवले गेले आहेत.
या टोल नाक्यांवर आता मोटार, जीप व हलक्या वाहनांना एक एप्रिल पासून 120 रुपये टोल भरावा लागणार आहे. सध्या हा दर 115 रुपये एवढा आहे म्हणजेच यामध्ये पाच रुपयांची वाढ होणार आहे.
खेड शिवापूर टोल नाक्यावर बस आणि ट्रकसाठी एक एप्रिल पासून चारशे रुपये एवढा टोल लागणार आहे, सध्या हा रेट 390 रुपये एवढा आहे. अवजड वाहनांसाठी खेड शिवापूर टोल नाक्यावर एक एप्रिल पासून 630 रुपये एवढा टोल आकारला जाणार आहे, सध्या हा रेट 615 रुपये एवढा आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर आता किती टोल भरावा लागणार
या महामार्गावर चाळकवाडी आणि हिवरगाव असे दोन टोल नाके आहेत. या टोल नाक्यांवर मोटार, जीप व हलक्या वाहनांना एक एप्रिल पासून एकल वाहतुकीसाठी 110 रुपये एवढा टोल काढावा लागणार आहे, सध्या हा रेट 165 रुपये एवढा आहे.
दुहेरी वाहतुकीसाठी एक एप्रिल पासून हलक्या वाहन असलेल्यांना १६० रुपये टोल भरावा लागणार आहे. तसेच ट्रक व बसच्या एकेरी वाहतुकीसाठी ३७० रुपये द्यावे लागणार आहेत. तसेच एक एप्रिल पासून स्थानिक खासगी वाहनांसाठी ३४० रुपयांचा मासिक पास दिला जाणार आहे.