Pune Flyover Inauguration : पुणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गेल्या वर्षांपासून पुणे महापालिकेच्या माध्यमातून तसेच राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहरात वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत.
शिक्षणाचे माहेरघर म्हणून जगात ख्यातीप्राप्त असलेल्या पुण्यात गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या जटील बनली आहे. यामुळेच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी उन्नत कॉरिडॉर, ऍलिव्हटेड कॉरिडोर, उड्डाणपूल, भुयारी मार्ग तयार केले जात आहेत. चांदणी चौक परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी देखील चांदणी चौकात एक उड्डाणपूल विकसित केला जात आहे.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी गुड न्यूज ! आता शहराला मिळणार आणखी एक वंदे भारतची भेट, ‘या’ शहराशी थेट जोडलं जाणार Pune; पहा डिटेल्स
दरम्यान आता या उड्डाणपुलाबाबत एक मोठी आणि अति महत्त्वाची अशी माहिती समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या उड्डाणपुलाचे उद्घाटन मे महिन्यात करणे प्रस्तावित आहे. या पुलाचे काम एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण करून या पुलाचे उद्घाटन एक मे रोजी केले जाणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, चांदणी चौकातील या पुलाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे. दरम्यान उद्घाटनाची तारीख जवळ येत असल्याने या पुलाचे बाकी राहिलेले काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर ! लंडन आयच्या धर्तीवर ‘मुंबई आय’ प्रकल्प तयार होणार, उंच पाळण्यात बसून पाहता येणार जीवाची मुंबई, पहा……
एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या बहु चर्चेत पुलाचे काम जवळपास 90 टक्के पूर्ण झाले आहे. 10 टक्के बाकी राहिलेले काम जलद गतीने पूर्ण केले जात आहे. आता 15 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान या पुलाचे गर्डर टाकण्याचे काम सुरू होणार आहे.
गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच या पुलाचे उर्वरित काम केले जाणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या पुलाचे काम वेळेतच होणार असून उद्घाटन एक मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी सोने पे सुहागा ! आता मुंबई आणि नवी मुंबईमधला ‘हा’ भाग मेट्रो मार्गाने जोडला जाणार, पहा कसा असेल रूटमॅप