Pune Farmer News : आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. यामुळे देशातील अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढावे यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. देशाच्या इकॉनॉमीमध्ये शेती क्षेत्राचा मोठा वाटा आहे. यामुळे जर देशाची इकॉनॉमी आणखी सक्षम बनवायची असेल तर शेती क्षेत्राकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
सध्या भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. लवकरच ती तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणारा असा विश्वास अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पण यासाठी शेती क्षेत्राकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
सरकारलाही ही गोष्ट चांगलीच ठाऊक आहे. यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांसाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजना ही देखील अशीच एक योजना आहे.
या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्यां शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात आहेत. मात्र हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकरकमी न देता दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने दिले जातात.
आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण 17 हप्ते दिले गेले आहेत. विशेष म्हणजे अठरावा हप्ता येत्या ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे केंद्रातील याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेतूनही शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात. हे सहा हजार रुपये सुद्धा दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे वितरित केले जातात.
आतापर्यंत या योजनेतून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण तीन हप्ते देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे लवकरच चौथा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो. राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसानचे 6000 आणि नमो शेतकरीचे 6,000 असे एकूण वार्षिक 12 हजार रुपये दिले जाणार आहेत.
या दोन्ही योजनेचा पुणे जिल्ह्यातील चार लाख 34 हजार 51 शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. आतापर्यंत या योजनेतून या संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात 1698 कोटी 70 लाख रुपयांचा लाभ शासनाकडून वितरित करण्यात आला आहे.
शासकीय आकडेवारीनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ४ लाख ३४ हजार ५१ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यांच्या बँक खात्यात आजपर्यंत १ हजार ४५० कोटी ५० लाख रुपयांचा लाभ जमा करण्यात आला आहे.
तसेच नमो शेतकरी योजनेसाठी जिल्ह्यातील ४ लाख ३९ हजार ६५३ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यांच्या बँक खात्यात आजवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून एकूण २४८ कोटी २० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.