Pune Anganwadi Sevika : पुणे जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित झाली आहे. पुणे झेडपी अंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली असून यासाठीची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे.
दरम्यान आज आपण पुणे जिल्ह्यात किती अंगणवाडी सेविकांच्या पदांसाठी भरती आयोजित झाली आहे यासाठी अर्ज कसा करायचा यासाठी पात्रता नेमक्या काय याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- Cotton News : एप्रिल महिन्यात कापूस दर वाढीची शक्यता; किती वाढणार भाव? पहा कृषी क्षेत्रातील जाणकारांचे मत
किती पदांसाठी निघाली आहे भरती?
जसं की आपण बघितलंच पुणे जिल्हा परिषद अंतर्गत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका या पदासाठी भरती काढण्यात आली आहे. यामध्ये अंगणवाडी सेविकेचे 134 पदे भरली जाणार आहेत. अंगणवाडी मदतनीस 653 पदे भरले जाणार आहेत तसेच मिनी अंगणवाडी सेविका याची 31 पदे भरली जाणार आहेत. म्हणजेच एकूण 818 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा?
या तिन्ही पदांसाठी किमान 12 वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहे. 18 ते 35 वयोगटातील उमेदवार यासाठी पात्र राहणार आहेत.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! देशातील ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपये; कोणाला मिळणार लाभ? वाचा सविस्तर
नोकरी करण्याचे ठिकाण?
पुणे जिल्ह्यात निवड झालेल्या उमेदवारांना नोकरी करावी लागणार आहे.
अर्ज कुठे सादर करायचा?
अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. अर्जदार अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात भरू शकणार आहेत. अर्ज भरताना मात्र खाडाखोड नसावी. यासोबतच सर्व आवश्यक कागदपत्रे देखील अर्जदाराला सादर करावे लागणार आहेत. यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवाशी दाखला यांसारखी इतर अन्य महत्त्वाच्या कागदपत्रांचा समावेश राहणार आहे. अर्ज काळजीपूर्वक आणि व्यवस्थितरित्या भरल्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुणे या ठिकाणी हा अर्ज इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सादर करायचा आहे.
हे पण वाचा :- रेल्वे प्रवाशांना लवकरच मिळणार 11व्या वंदे भारत ची भेट! ‘या’ रूटवर धावणार, पहा संपूर्ण रूटमॅप