Pune Amravati Railway News : मध्य रेल्वेच्या माध्यमातून एक मोठा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की आता उन्हाळा सुरू झाला असून शाळांना उन्हाळ्यामध्ये सुट्ट्या राहणार आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सुट्ट्यामध्ये गावी परतणार आहेत. अशा परिस्थितीत रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी आता राहणार आहे.
या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या माध्यमातून पुणे आणि अमरावतीकरांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे ते अमरावती दरम्यान मध्य रेल्वेच्या माध्यमातून आता एका विशेष गाडीचे नियोजन करण्यात आले आहे. मध्यरेल्वेने पुणे ते अमरावती प्रवासासाठी एक विशेष गाडी सुरू केली असून या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे.
हे पण वाचा :- पांढर सोन चमकल ! कापूस दरात वाढ; कापूस 10 हजाराचा टप्पा गाठणार का? दरवाढ होणार का? पहा काय म्हणताय तज्ञ
मध्य रेल्वेच्या या निर्णयाचे प्रवाशांच्या माध्यमातून स्वागत केले जात असून ऐन सुट्टीच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय प्रवाशांच्या दृष्टीने अति महत्त्वाचा ठरणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१४५२ पुणे-अमरावती स्पेशल एक्स्प्रेस गुरुवार म्हणजे 6 एप्रिल 2023 पासून पुण्याहून अमरावती पर्यंत सुरू झाली आहे.
दरम्यान आता आपण या स्पेशल ट्रेन चे वेळापत्रक नेमके कसे राहणार आहे, पुण्याहून अमरावतीला ही ट्रेन कशी जाईल आणि अमरावतीहून पुण्याला ही ट्रेन कशी येईल या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ ठिकाणी विकसित होणार नवीन केबल स्टेड ब्रिज, वाचा याविषयी सविस्तर माहिती
कसं असेल वेळापत्रक
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-अमरावती गाडी मनमाडला रात्री नऊ वाजून ५५ मिनिटांनी येणार आहे आणि अमरावतीला सकाळी अकराला पोहचणार आहे. तसेच अमरावतीहून ही ट्रेन सायंकाळी सहा वाजता निघणार आहे आणि रात्री साडेबाराला मनमाड या रेल्वे स्टेशनवर पोहोचणार आहे.
निश्चितच या ट्रेनचा उन्हाळ्यातील सुट्ट्यांमध्ये प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. खरं पाहता शिक्षणाचे माहेरघर पुणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अमरावती येथील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात दरम्यान आता मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अमरावतीकडे रवाना होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर मध्यरेल्वेने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा केवळ विद्यार्थ्यांनाच फायदा होईल असं नाही तर पुण्यामध्ये कामानिमित्त येणाऱ्या अमरावतीकरांना देखील याचा मोठा फायदा होणार आहे. अकोला, भुसावळ, शेगाव, मनमाड या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना देखील याचा फायदा होईल.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! आज 2 नवीन वंदे भारत एक्सप्रेस लाँच होणार; कोणत्या रूटवर धावणार, कसं असणार वेळापत्रक? पहा….