Pumpkin Farming: देशात अलीकडे भाजीपाला लागवड (Vegetable Farming) मोठ्या प्रमाणात केली जाऊ लागली आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील भाजीपाला लागवड विशेष उल्लेखनीय आहे.
राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) कमी खर्चात आणि कमी दिवसात तयार होणाऱ्या भाजीपाला पिकांची (Vegetable crop) आता मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत. विशेष म्हणजे यामुळे शेतकरी बांधवांना चांगला फायदा (Farmer Income) होत आहे. भोपळा हे देखील एक प्रमुख भाजीपाला पीक आहे.
या पिकाचे देखील आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात लागवड आहे. अशा परिस्थितीत जर शेतकरी बांधवांना भोपळा लागवड करायची असेल तर आज आम्ही शेतकरी बांधवांसाठी भोपळ्याच्या काही सुधारित जातींची (Pumpkin Variety) माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया भोपळ्याच्या काही सुधारित जाती.
मित्रांनो जाणकार लोकांच्या मते, भोपळ्याची लागवड करायची असल्यास शेतकरी बांधवांनी भोपळ्याच्या सुधारित जातींची लागवड केली पाहिजे. यामुळे उत्पादनात वाढ होणार आहे. शिवाय उत्पादन खर्चात बचत आणि उत्पन्न भरपूर मिळणार आहे.
काशी हरित
हिरवा रंग आणि सपाट गोल आकार असलेली ही जात पेरणीनंतर 50 ते 60 दिवसांनी उत्पादन देण्यासाठी तयार होत असल्याचा दावा केला जातो. या जातीचा एक भोपळा सुमारे 3.5 किलोचा असतो आणि काशी हरितच्या एका झाडाला चार ते पाच फळे येतात. प्रति हेक्टर शेतात पिकाची लागवड केल्यास ते 400 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते.
पुसा विश्वास
देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पिकवल्या जाणार्या पुसा विश्वास या जातीच्या भोपळ्यातुन प्रति हेक्टर 400 क्विंटल उत्पादन मिळते. त्याची फळे हिरव्या रंगाची असतात, त्यावर पांढरे डाग असतात. पुसा विश्वासाच्या एका फळाचे वजन सुमारे 5 किलो असते, जे पेरणीनंतर 120 दिवसांत काढणीसाठी तयार होते. प्रत्येक हेक्टर जमिनीवर या जातीची लागवडी करून तुम्ही 400 क्विंटल दर्जेदार उत्पादन मिळवू शकता.
नरेंद्र आभूषण
या जातीच्या भोपळ्याचा आकार मध्यम गोल असून त्यावर गडद हिरवे डाग असतात. या जातीची फळे पिकल्यानंतर केशरी रंगाची होतात, ज्याची लागवड करून प्रति हेक्टर 400 क्विंटलपर्यंत उत्पादन घेता येते.
काशी उज्ज्वल
उत्तर आणि दक्षिण भारतातील शेतकऱ्यांमध्ये भोपळ्याची ही जात प्रसिद्ध आहे. प्रत्येक झाडावर 4 ते 5 फळे येतात आणि प्रत्येक फळाचे वजन 10 ते 15 किलो असते. ही वाण 180 दिवसांत परिपक्व होते, जे प्रति हेक्टर 550 क्विंटलपर्यंत उत्पादन देऊ शकते.
काशी धवन
काशी धवन भोपळा डोंगराळ भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. पेरणीच्या अवघ्या 90 दिवसांत तयार होणारी ही जात प्रति हेक्टरी 600 क्विंटलपर्यंत उत्पादन देते. काशी धवन भोपळ्याच्या प्रत्येक फळाचे वजन 600 ग्राम पर्यंत असते.