Pumpkin Farming: आपल्या देशात खरीप हंगामात (Kharif Season) मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांची शेती (Vegetable Farming) केली जाते. भोपळा (Pumpkin Crop) हे देखील प्रमुख भाजीपाला पीक (Vegetable Crop) आहे. या पिकाची शेती खरीप हंगामात केल्यास शेतकरी बांधवांना दुपटीने नफा मिळतो. भोपळा भारतातील एक मुख भाजीपाला वर्गीय पिकं आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी इथे नमूद करू इच्छितो की, आपला भारत देश भोपळ्याच्या उत्पादनाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. भोपळ्याचा वापर भाजी बनवण्यासाठी तसेच मिठाई बनवण्यासाठी देखील होत असल्याने याला बारमाही मागणी असते. शिवाय भोपळ्याच्या पिकाला चांगला बाजार भाव देखील मिळतो यामुळे भोपळ्याची शेती शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याची ठरत असल्याचा दावा जाणकार लोक करत असतात.
भोपळ्यामध्ये विटामिन ए आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे याचे सेवन डोळ्याच्या आरोग्यासाठी अधिक फायद्याचे असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी भोपळ्याच्या काही सुधारित जाती (Pumpkin Variety) तसेच भोपळ्याची शेती कशा पद्धतीने केली तर त्यांना फायदा होऊ शकतो याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
भोपळा शेतीसाठी उपयुक्त शेतजमीन कोणती बरं…!
भोपळ्याच्या लागवडीसाठी चांगली निचरा व्यवस्था असलेली आणि भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली चिकणमाती माती आवश्यक असते. भोपळ्याच्या लागवडीसाठी मातीचे पीएच 6-7 इष्टतम आहे.
भोपळ्याच्या काही सुधारित जाती जाणून घेऊया
खरं पाहिल्यास भारतात भोपळ्याच्या अनेक सुधारित जाती विकसित केल्या गेल्या आहेत. मात्र असे असले तरी आज आपण भोपळ्याच्या अशा जाती जाणून घेणार आहोत ज्याची शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. भारतात शेतकरी बांधव अर्का चंदन, अर्का सूर्यमुखी, भोपळा-१, नरेंद्र अमृत, आंबळी, पुसा विश्वास, पुसा विकास, कल्याणपूर, सी.एस. 14, CO 1 आणि 2 इ. जातींची मोठ्या प्रमाणात शेती करत असतात.
याशिवाय आपल्या देशात शेतकरी बांधव विदेशी जातींची देखील शेती करत असतात.शेतकरी बांधव गोल्डन हबर्ड, गोल्डन कस्टर्ड, यलो स्टेट नेक, पट्टीपन, ग्रीन हबर्ड या विदेशी जातीची मोठ्या प्रमाणात शेती करत असल्याचे जाणकार नमूद करतात. या सुधारित जातींची शेतकरी बांधवांनी शेती केल्यास त्यांना चांगला बक्कळ पैसा मिळू शकतो असा तज्ज्ञांचा दावा आहे.
भोपळा लागवडीची तयारी कशी करावी बरं…!
भोपळा लागवडीसाठी पूर्वमशागत अतिशय महत्त्वाचा रोल अदा करते. यामुळे या पिकातून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी शेतजमीन चांगली तयार करणे आवश्यक आहे. शेत जमिनीची नांगरणी ट्रॅक्टरच्या साह्याने करावी लागते. ट्रॅक्टरच्या साह्याने शेत जमिनीची नांगरणी केल्यानंतर भोपळ्याची लागवड केली जाते.
जाणकार लोकांच्या मते, फेब्रुवारी-मार्च आणि जून-जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील सुरुवातीचे काही दिवस भोपळ्याच्या पेरणीसाठी योग्य आहे. प्रत्येक आधारावर दोन बिया पेराव्यात आणि 60 सेमी अंतर वापरावे. संकरित वाणांसाठी वाफ्याच्या दोन्ही बाजूंनी बिया पेरून 45 सें.मी. अंतर ठेवून बियाणे 1 इंच खोल जमिनीत पेरावे. पेरणीची पद्धत सरळ ठेवा एक एकर जमिनीसाठी 1 किलो बियाणे पुरेसे आहे.