Poultry Farming Tips : मित्रांनो भारतात कुकूटपालन व्यवसाय (Poultry Farming ) मोठ्या प्रमाणात केला जात आहे. कुकूटपालन व्यवसाय हा एक प्रमुख शेती पूरक व्यवसाय (Agriculture Business) म्हणून ओळखला जातो. कुक्कुटपालनाचा व्यवसाय अलीकडे शेतकऱ्यांसाठी (Farmer) खूप फायदेशीर ठरत आहे.
आजच्या काळात शेतकरी बांधव या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात वळत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला देखील कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी.
मित्रांनो आज आपण कोंबडीच्या एका सुधारित जातीची (Chicken Breed) माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण कोंबडीच्या अशा जातीची माहिती जाणून घेणार आहोत जी जात तब्बल अडीचशे अंडी देण्यास सक्षम आहे. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
कुक्कुटपालन व्यवसाय (poultry farming tips)
या आधुनिक काळात पशुपालनाचा व्यवसाय (animal husbandry) झपाट्याने होत आहे. अशा परिस्थितीत कुक्कुटपालन करून लोक चांगले उत्पन्न (Farmer Income) घेत आहेत. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, बाजारात कोंबडीचे (chicken) मांस अंडी याची मागणी वेगाने वाढत आहे.
एवढेच नाही तर बाजारात त्यांची किंमतही खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी निश्चितच अतिरिक्त उत्पन्नाचे साधन बनणार आहे. या व्यवसायाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे कमी खर्चातही तुम्ही हा व्यवसाय (Business) सहज सुरू करू शकता.
कोंबडीची ही जात एका वर्षात 250 अंडी देण्यास सक्षम
कोंबडीच्या जातीमध्ये, प्लायमाउथ रॉक कोंबडी (plymouth rock chicken) व्यवसायासाठी सर्वोत्तम मानली जाते, कारण या कोंबडीच्या जातीपासून आपल्याला वर्षभरात सुमारे 250 अंडी मिळतात. खरं पाहिले तर या कोंबडीच्या अंड्याचे सरासरी वजन सुमारे 60 ग्रॅम असते.
दुसरीकडे, जर आपण या कोंबडीबद्दल बोललो तर त्याचे एकूण वजन 3 किलो पर्यंत असते. ही कोंबडी दिसायला खूप सुंदर दिसते. याचे कान लाल रंगाचे असून चोच पिवळी असते. या कोंबडीला अमेरिकन ब्रीड असेही म्हणतात.
प्लायमाउथ रॉक कोंबडीची वैशिष्ट्ये
या जातीची कोंबडी अतिशय शांत स्वभावाची असते.
या कोंबड्यांना फिरायला आवडते, त्यामुळे त्यांचा शरीराचा आकारही चांगला असतो.
या कोंबडीच्या मांसाला आणि अंड्यांना बाजारात मोठी मागणी असते. अशा परिस्थितीत कुक्कुट पालन करणाऱ्या लोकांनी या जातीचे संगोपन केल्यास त्यांना फायदा होणार आहे.