Poultry Farming: भारतात शेती व्यवसायाच्या (Agriculture) सुरवातीपासूनच शेती पूरक व्यवसाय (Agri Business) केले जात आहेत. विशेष म्हणजे शेती पूरक व्यवसाय शेतकरी बांधवांसाठी अतिशय फायद्याचे ठरत आहेत. कुक्कुटपालन (Poultry Business) हा देखील एक शेती पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जात असून गेल्या अनेक दशकांपासून कुकूटपालन व्यवसाय शेतकरी बांधव (Farmer) करत आले आहेत.
या व्यवसायाच्या माध्यमातून अतिशय कमी खर्चात शेतकरी बांधवांना चांगली कमाई (Farmer income) होत असल्याने अलीकडे व्यावसायिक स्तरावर कुकूटपालन व्यवसाय केला जाऊ लागला आहे. मित्रांनो खरे पाहता आता व्यावसायिक स्तरावर कुकुट पालन केले जात असल्याने देशी कोंबड्यांचे संगोपन खूपच कमी प्रमाणात बघायला मिळत आहे.
यामुळे जर अल्पभूधारक शेतकरी बांधवांनी देशी कोंबड्यांचे संगोपन सुरू केले तर निश्चितच त्यांना या देशी कोंबड्यांच्या संगोपनातून देखील लाखोंची कमाई होणे शक्य आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी देशी कोंबड्यांच्या काही जातींची (chickens breed) माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
मित्रांनो, देशी कोंबड्यांच्या जातींची माहिती जाणून घेण्याअगोदर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शेतकऱ्यांना घरगुती कुक्कुटपालनासाठी जास्त गुंतवणुक करण्याची गरज भासत नाही. शेतकरी बांधव मात्र 40 ते 50 हजार रुपयांमध्ये देशी कोंबडी पालन व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय शेतकरी बांधव त्यांच्या घराच्या, अंगणात किंवा परसबागेत किंवा शेतात मोकळ्या जागेत सुरू करू शकतात.
यामुळे पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी आवश्यक मोठा निधी देखील शेतकरी बांधवांना खर्च करावा लागणार नाही. निश्चितच देशी कोंबडी पालन हा व्यवसाय शेतकरी बांधव कमी पैशात सुरू करू शकणार आहेत आणि यातून त्यांना भली मोठी कमाई देखील होणार आहे. विशेष म्हणजे शेतकरी बांधवांना पशुधन अभियानांतर्गत हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदानही दिले जात आहे. चला तर मग मित्रांनो आता वेळ न दवडता जाणून घेऊया देसी कोंबडीच्या काही जाती.
देशी कोंबडीच्या जाती
ग्रामप्रिया- या जातीच्या कोंबडीपासून अंडी व मांस दोन्ही मिळतात. त्यांचे मांस तंदूरी चिकन बनवण्यासाठी जास्त वापरले जाते. ग्रामप्रिया कोंबडीची वर्षभरात सरासरी 210 ते 225 अंडी घालण्याची क्षमता आहे.
श्रीनिधी- श्रीनिधी कोंबडी देखील मांस आणि अंडी या दोन्हीद्वारे अधिक नफा मिळवू शकतात. या जातीची कोंबडी फार लवकर विकसित होते आणि फार कमी वेळात चांगला नफा मिळवून देते.
वनराजा- देशी कोंबड्यांच्या जातीमध्ये वनराजा सर्वोत्तम मानली जातो. या कोंबड्या 120 ते 140 अंडी घालतात. ही कोंबडी पाळल्यास कमी वेळात चांगला नफा मिळू शकतो.