Pomegranate Rate : महाराष्ट्र हा कांदा कापूस आणि सोयाबीन या नगदी पिकांच्या उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. यासोबतच राज्याची फळ उत्पादनात देखील एक वेगळी ओळख प्रस्थापित झाली आहे. फळ उत्पादनात प्रामुख्याने द्राक्ष आणि डाळिंब या दोन फळांच्या आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे.
जेव्हा केव्हा डाळिंब उत्पादनाचा विचार येतो तेव्हा पश्चिम महाराष्ट्राचे नाव सर्वप्रथम डोळ्यापुढे उभे राहते. याचे कारणही तसेच खास आहे पश्चिम महाराष्ट्रात डाळिंबाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जात आहेत.
याव्यतिरिक्त इतरही विभागात कमी अधिक प्रमाणात डाळिंब पीक उत्पादित केले जात आहे. या पिकाची विशेषतः अशी की हे पीक कमी पाण्यात तयार होते. यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये या पिकाची लागवड राज्यात वाढली आहे.
दरम्यान राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आहे. ती म्हणजे राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या बाजारपेठेत डाळिंबाला प्रति किलो 221 रुपये एवढा विक्रमी भाव मिळाला आहे.
खरे पाहता डाळिंबाचे दर दिवाळीच्या पूर्वी याहीपेक्षा अधिक तेजीत होते. मात्र दिवाळीनंतर डाळिंबाच्या दरात थोडीशी घसरण झाली होती. पण आता पुन्हा एकदा सोलापूर मध्ये डाळिंब कडाडला आहे.
जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब मार्केट यार्ड मध्ये आता डाळिंबाला चांगला भाव मिळू लागला आहे. बाजार अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने डाळिंबाच्या दरात वाढ होत आहे.
अकलूज एपीएमसी मध्ये देखील आवक कमी होऊ लागले आहे. आवक कमी होत असल्याने आता बाजारभाव सुधारले आहेत. काल अर्थातच 21 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये डाळिंबाला 221 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव मिळाला आहे.
म्हणजेच 4420 रुपये प्रति 20 किलो कॅरेट असा विक्रमी दर या एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील डाळिंब उत्पादकांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खुळेवाडी येथील शेतकरी अजित खुळे यांच्या डाळिंबाला हा विक्रमी भाव मिळाला आहे. खुळे हे एक प्रयोगशील डाळिंब उत्पादक आहेत. त्यांनी उत्पादित केलेले डाळिंब हे दर्जेदार असून त्यामुळे डाळिंबाला चांगला भाव मिळत आहे.
त्यांनी मार्केट यार्डात विठ्ठल फ्रुट कंपनीकडे २५ क्रेट डाळिंब आणले होते. यापैकी ३ क्रेट डाळिंबाला प्रति कॅरेट 4420 म्हणजेच प्रति किलो 221 रुपये असा भाव मिळाला आहे. तर उर्वरित डाळिंबही त्याच्या प्रतवारीनुसार विकले गेले आहेत.