Pomegranate Farming : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये फळ लागवडीला मोठी चालना मिळाली आहे. राज्यातही विविध फळांची लागवड केली जात आहे. महाराष्ट्रात डाळिंब, द्राक्ष, केळी, पपई, सिताफळ अशा अनेक फळांची लागवड होत आहे. डाळिंबा बाबत बोलायचं झालं तर डाळिंबाची लागवड राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणात केली जाते.
मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा तर डाळिंब उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. या जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा अर्थातच कसमादे पट्टा हा डाळिंब उत्पादनासाठी विशेष लोकप्रिय आहे.
या भागात बहुतांशी शेतकरी डाळिंबाची लागवड करतात आणि चांगले उत्पादन मिळवतात. दरम्यान जर तुम्हीही डाळिंब लागवडीच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे. कारण की आज आपण डाळिंबाच्या टॉप 5 व्हरायटिंची माहिती जाणून घेणार आहोत.
डाळिंबाच्या लोकप्रिय टॉप पाच व्हरायटी
आरक्ता : या जातीची देखील राज्यात मोठ्या प्रमाणात शेती होत आहे. आधीच्या तुलनेत या जातीची लागवड काहीशी कमी झाली आहे मात्र आजही अनेक शेतकरी या जातीवर अवलंबून आहेत. पूर्वी नाशिक जिल्ह्यात देखील याची लागवड मोठ्या प्रमाणात होती आता मात्र किंचित याची लागवड कमी झाली आहे. या जातीचे फळ मध्यम आकाराचे असते आणि साल गडद लाल रंगाची असते. डाळिंबाचा हा लोकप्रिय वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या कृषी विद्यापीठाने विकसित केला आहे.
रुबी : डाळिंबाची ही एक सुधारित जात आहे. याची लागवड अलीकडील काही वर्षांमध्ये वाढली आहे यात शंका नाही. शेतकऱ्यांना यापासून चांगले उत्पादन मिळत आहे.
भगवा : महाराष्ट्रात या व्हरायटीची मोठ्या प्रमाणात लागवड होते. हि व्हरायटी नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादित होते. नाशिकसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये या जातीची लागवड केली जात असून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. या जातीचे फळ आकार आणि मोठे असतात.
फळांचा रंग चकचकीत लाल आणि या जातीच्या फळाची साल जाड असते. बाजारात या जातीच्या डाळिंबाला मोठी मागणी आहे. या जातीचे डाळिंब गोड असतात. डाळिंबाची ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या संस्थेने विकास शेतकरी आहे.
कंधारी सिडलेस : डाळिंबाची ही देखील एक सुधारित जात आहे. या जातीचे फळ आकाराने मोठे असते. या जातीच्या फळाची साल गडद लाल रंगाची असते. यापासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जात आहे.
सोलापूर लाल : सोलापूरला लाल ही महाराष्ट्रात उत्पादित होणारी डाळिंबाची एक प्रमुख जात आहे. सोलापूर जिल्ह्यात याची लागवड अधिक आहे. नाशिकमध्येही काही भागात याची लागवड पाहायला मिळते.
या जातीचे फळ भगव्या प्रमाणेच दिसते. परंतु या जातीच्या फळाचा आकार भगव्यापेक्षा थोडासा कमी असतो. याला भगव्यापेक्षा कमी दर मिळत असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून मिळाली आहे.