PM Surya Ghar Scheme : सर्वसामान्यांसाठी 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. मोदी सरकारने सत्ता स्थापित केल्यापासून आत्तापर्यंत अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने नुकतीच पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली आहे.
या अंतर्गत दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे. याचा १ कोटी कुटुंबांना लाभ दिला जाणार असा दावा केंद्रातील मोदी सरकारने केला आहे. खरेतर या योजनेची घोषणा 22 जानेवारी 2024 ला करण्यात आली. श्रीक्षेत्र अयोध्या येथील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर या योजनेची पंतप्रधान महोदय यांनी घोषणा केली.
त्यावेळी पंतप्रधान महोदय यांनी या योजनेला पीएम सूर्योदय योजना असे संबोधले होते. यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेसाठी 75 हजार कोटी रुपयांचा खर्च होईल असे सांगितले. यानंतर मग केंद्रीय कॅबिनेटने या योजनेला मंजुरी दिली.
यावेळी या योजनेचे नामकरण पीएम सूर्य घर मोफत वीज योजना असे करण्यात आले. तसेच या योजनेसाठी नवीन पोर्टल देखील सुरू करण्यात आले आहे. या नवीन योजनेंतर्गत आता रूफटॉप सोलर सिस्टीम बसविणाऱ्या लोकांना सबसिडी दिली जाणार आहे.
याअंतर्गत किमान ३० हजार रुपये एवढे अनुदान दिले जाणार आहे. अशा परिस्थितीत, आता आपण या योजनेच्या माध्यमातून लोकांना एक किलोवॅट, दोन किलोवॅट आणि तीन किलोवॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी किती अनुदान मिळेल आणि यासाठी अर्ज करण्याची प्रोसेस कशी राहणार याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती सबसिडी मिळणार ?
या योजनेबाबत नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या अंतर्गत किती सबसिडी मिळणार ? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पीएम सूर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत, 1 किलोवॅट रूफटॉप सोलर सिस्टीम बसविणाऱ्या व्यक्तीला 30,000 रुपयांची सबसिडी दिली जाईल.
2 KW ची सिस्टीम बसवणाऱ्यांना 60,000 रुपये आणि 3 kW किंवा त्यापेक्षा अधिक आणि 10 किलोवॅट पर्यंतच्या रुफटॉप सोलर सिस्टीम बसवणाऱ्यांना 78,000 रुपयांची सबसिडी मिळणार आहे. म्हणजेच, या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना किमान 30 हजार रुपयांचे अनुदान मिळू शकणार आहे. नागरिक त्यांच्या गरजेनुसार 1 KW पासून ते 10 KW क्षमता असलेले सोलर पॅनल सिस्टम बसवू शकणार आहेत.
सोलर पॅनलसाठी अर्ज कसा करायचा ?
- या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करणे हेतू सर्व्यात आधी https://pmsuryaghar.gov.in या सरकारच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी पूर्ण करावी लागणार आहे. यासाठी राज्य आणि वीज वितरण कंपनी निवडडून आणि वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेल टाकावा लागणार आहे.
- याधिकृत पोर्टलवर नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा अर्जदाराला लॉगिन करावे लागणार आहे. यासाठी ग्राहक क्रमांक आणि मोबाइल क्रमांक टाकावा लागेल. लॉग इन केल्यानंतर फॉर्मनुसार रूफटॉप सोलरसाठी अर्ज करता येईल.
- अर्ज सादर झाल्यानंतर अर्जदाराला DISCOM कडून व्यवहार्यता मंजूरी मिळणार आहे. ही मंजुरी मिळाली की सोलर पॅनल इंस्टॉल करता येणार आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून प्लांट स्थापित करता येणार आहे.
- इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, प्लांटचे संपूर्ण तपशील पुन्हा एकदा पोर्टलवर सबमिट करावे लागेल आणि नेट मीटरसाठी अर्ज करावा लागणार आहे.
- नेट मीटरसाठी अर्ज केल्यानंतर नेट मीटर बसवले जाईल आणि मग DISCOM द्वारे पडताळणी पूर्ण होईल. मग, पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार केले जाईल.
- कमिशनिंग रिपोर्ट मिळाल्यावर अनुदान मिळवण्यासाठी बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक पोर्टलवर जमा करावा लागणार आहे. एवढे केले की, सदर अर्जदार व्यक्तीच्या बँक खात्यावर त्यांनी इन्स्टॉल केलेल्या सोलर प्लांटच्या क्षमतेनुसार अनुदान वितरित केले जाणार आहे.