Pm Surya Ghar Mofat Vij Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. दरम्यान 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळात देखील अशाच काही कौतुकास्पद योजना सुरू केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशीच एका योजना सुरु केली आहे.
या योजनेला पीएम सुर्य घर मोफत वीज योजना असे नाव देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील एक कोटी कुटुंबांना दरमहिना 300 युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचा शासनाचा मानस आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जात आहे.
या योजनेची घोषणा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच झाली आहे. 22 जानेवारी 2024 ला अर्थातच श्रीक्षेत्र अयोध्या येथील भव्य राम मंदिराच्या उद्घाटन सोहळाच्या दिवशी या योजनेची मोदी यांनी घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी या योजनेला पीएम सूर्योदय योजना असे संबोधले होते. मात्र जेव्हा या योजनेला केंद्रीय कॅबिनेट मध्ये मंजुरी मिळाली तेव्हा याचे पीएम सूर्यघर मोफत विधी योजना असे नामकरण करण्यात आले आहे.
सोलर पॅनल साठी किती सबसिडी मिळणार
या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. या अंतर्गत नागरिकांना कमाल 78 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. हे अनुदान मात्र सोलर पॅनलच्या क्षमतेनुसार राहणार आहे. समजा एखाद्या ग्राहकाने एक किलोवॅटचे सोलर पॅनल बसवले तर त्याला 30 हजाराचे अनुदान मिळणार आहे.
जर एखाद्याला दोन किलो वॅटचे सोलर पॅनल बसवायचे असेल तर त्याला 60,000 रुपयाचे अनुदान मिळणार आहे. जर समजा एखाद्या कुटुंबाचा वापर यापेक्षा अधिक असेल आणि त्यांना तीन किलो वॅट किंवा तीन किलो वॅट पेक्षा जास्त परंतु दहा किलो वॅट पर्यंतचे क्षमतेचे सोलर पॅनल बसवायचे असेल तर त्यांना 78 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
एक कोटी लोकांनी केलाय अर्ज
ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक महत्वकांक्षी योजना आहे. मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत या योजनेसाठी देशभरातील एक कोटी नागरिकांनी अर्ज केला आहे. दरम्यान या योजनेसाठी पात्र आणि इच्छुक नागरिकांना अधिकाधिक अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे.
पीएम सूर्य घर मोफत विज योजनेचे नियम कसे आहेत ?
पंतप्रधान सूर्य घर योजनेचा लाभ देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मिळणार आहे.
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत फक्त स्वतःचे घर असलेल्या लोकांना लाभ मिळणार आहे.
सौर पॅनेल बसवण्यासाठी घराला छत असणे आवश्यक आहे. कारण की छतावर सोलर पॅनल बसवले जाणार आहेत. म्हणजेच फ्लॅटमध्ये असणाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही.
कुटुंबाकडे वैध वीज जोडणी असली पाहिजे आणि घराने सौर पॅनेलसाठी इतर कोणतेही अनुदान घेतलेले नसावे.
या योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी फक्त नोंदणीकृत विक्रेत्याकडून सोलर पॅनल इंस्टॉल करावे लागणार आहेत.