Pm Surya Ghar Mofat Vij Yojana : केंद्रातील मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आधी सर्वसामान्यांसाठी सूर्य घर मोफत वीज योजनेची घोषणा केली. योजनेची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली.
खरे तर या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2024 मध्ये अयोध्या येथील प्रभू श्री रामरायाच्या मंदिराच्या उद्घाटनाप्रसंगी केली होती. त्यावेळी त्यांनी या योजनेला पीएम सूर्योदय योजना असे म्हटले होते.
मात्र जेव्हा या योजनेचा जीआर निघाला तेव्हा याला पीएम सूर्य घर मोफत वीज योजना असे नाव देण्यात आले. या योजनेअंतर्गत देशभरातील एक कोटी कुटुंबांना लाभ दिला जाणार आहे.
गरजू लोकांना या अंतर्गत छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान पुरवले जाणार आहे. या अंतर्गत एक किलो वॅट पासून ते तीन किलो वॅट क्षमतेच्या सोलर पॅनल साठी अनुदान दिले जाणार आहे.
किती मिळणार अनुदान ?
सोलर पॅनल बसवण्यासाठी पात्र नागरिकांना पॅनलच्या क्षमतेनुसार अनुदान पुरवले जाणार आहे. एक किलो वॅट क्षमतेच्या सोलर पॅनल साठी तीस हजार, दोन किलो वॅट क्षमतेच्या सोलर पॅनल साठी 60 हजार, 3 किलो वॅट क्षमतेच्या सोलर पॅनल साठी 78,000 असे अनुदान या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे. आता आपण या योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कोणाला नाही मिळणार लाभ ?
कुटुंबात जर कोणी सरकारी नोकरीला असेल तर अशा कुटुंबातील अर्जदार व्यक्तीला याचा लाभ मिळणार नाही.
दीड लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील अर्जदाराला याचा लाभ मिळू शकणार नाही.
या योजनेच्या माध्यमातून छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. यामुळे भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना याचा फायदा होणार नाही.
तसेच फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांनाही या योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसवता येणार नाही.
फक्त स्वातंत्र घर असणाऱ्या लोकांना या अंतर्गत अनुदान मिळणार आहे.
अर्ज कुठं करणार
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. केंद्र सरकारने या योजनेसाठी एक स्वतंत्र पोर्टल डेव्हलप केले आहे. https://www.pmsuryaghar.gov.in/ हे या योजनेचे अधिकृत पोर्टल आहे. इच्छुक आणि पात्र नागरिक या संकेतस्थळावरून या योजनेच्या लाभासाठी अर्ज करू शकतात.