Pm Narendra Modi Vande Bharat Railway : गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला दोन वंदे भारत एक्सप्रेस ची भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी यादरम्यान दन वंदे भारत एक्सप्रेस ची सुरुवात गेल्या महिन्यात झाली. यामुळे महाराष्ट्रात सध्या स्थितीला चार वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत.
तसेच संपूर्ण देशाचा विचार केला असता देशात एकूण दहा वंदे भारत एक्सप्रेस सध्या सुरू आहेत. दरम्यान आता देशाला अकरावी वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. ही ट्रेन उद्या अर्थातच एक एप्रिल 2023 रोजी दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या करकमलाद्वारे सुरु केली जाणार आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कांदा अनुदानाच्या अटीमध्ये होणार बदल?
वास्तविक अकरावी वंदे भारत ट्रेन ही दिल्ली ते जयपूर दरम्यान चालवली जाईल असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात होता. विशेष म्हणजे काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देखील असे संकेत मिळत होते. त्यामुळे राजस्थानची राजधानी आणि एक जागतिक पर्यटन स्थळ जयपुर देशाच्या राजधानीशी या ट्रेनने कनेक्ट होईल आणि या दोन्ही शहरांदरम्यानचा प्रवास अधिक सोयीचा होईल असं सांगितलं जात होतं.
मात्र जयपूर ते दिल्ली दरम्यान सुरू होणारी वंदे भारत एक्सप्रेस 11वी गाडी ठरणार नाही. तर अकरावी वंदे भारत एक्सप्रेस ही भोपाल ते दिल्ली दरम्यान सुरू केली जाणार आहे. मात्र असे असले तरी जयपूर ते दिल्ली दरम्यान देखील लवकरच ही ट्रेन सुरू होईल असा दावा केला जात आहे.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ भागातील वाहतूक तब्बल 21 एप्रिल पर्यंत राहणार बंद, पहा सविस्तर
उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाल दौऱ्यावर जाणार आहेत. दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी मोदी भोपाल येथील राणी कमलापती रेल्वे स्टेशनवर या भोपाल ते दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा झेंडा दाखवतील. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, या उद्घाटनाप्रसंगी शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना आमंत्रित करण्यात आले आहे.
निश्चितच हा उद्घाटनाचा सोहळा शाही बनवण्यासाठी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. एकंदरीत देशाला उद्या अकरावी बंदे भारत गाडी मिळणार असून महाराष्ट्राला देखील आगामी काही महिन्यात आणखी वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे पण वाचा :- कांदा अनुदान मिळवण्यासाठी बनावटगिरी सुरू; म्हणून आता ‘ही’ कागदपत्रे सादर केल्याशिवाय मिळणार नाही अनुदानाचा पैसा