Pm Mudra Loan Scheme : नुकत्याच तीन दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारने 2024-25 या आर्थिक वर्षाचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला आहे. तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रातील सरकारने अर्थसंकल्प मांडला आहे. यामुळे अर्थसंकल्पाकडे अनेकांच्या नजरा होत्या. खरे तर येत्या काही महिन्यांनी महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.
दरम्यान या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात विविध घटकातील नागरिकांसाठी अनेक मोठमोठ्या घोषणा होतील अशी आशा होती. यानुसार सरकारने या अर्थसंकल्पात अनेक मोठमोठ्या घोषणा देखील केल्या आहेत.
यामध्ये पीएम मुद्रा योजनेबाबतही मोठी घोषणा करण्यात आली आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पीएम मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची रक्कम वाढवण्याची मोठी घोषणा केली आहे.
यामुळे पुन्हा एकदा पीएम मुद्रा कर्ज योजना चर्चेत आली आहे. आधी या योजनेअंतर्गत कमाल दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळत होते. मात्र आता 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. म्हणजेच कर्जाची रक्कम दुपटीने वाढवण्यात आली आहे.
परंतु जर वीस लाख रुपयांचे कर्ज मिळवायचे असेल तर एक महत्त्वाची अट पूर्ण करावी लागणार आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या लोकांना या योजनेच्या माध्यमातून कर्ज मिळते. ही योजना नऊ वर्षांपूर्वी म्हणजेच 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती.
अजूनही ही योजना अविरतपणे सुरूच आहे. विशेष म्हणजे आता या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा वाढवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा दहा लाख रुपयांवरून वीस लाख रुपये एवढी करण्यात आली आहे.
पण, या वाढीव कर्ज मर्यादेचा फायदा घेण्यासाठी एक अट पूर्ण करावी लागणार आहे. ती म्हणजे वाढीव कर्ज फक्त अशा व्यावसायिकांना मिळणार आहे ज्यांनी या योजनेतंर्गत घेतलेले आधीचे कर्ज पूर्ण भरलेले असेल.
म्हणजे ज्यांनी कर्जाची रक्कम व्याजासहित जमा केली आहे फक्त अशा लोकांनाच वीस लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की पीएम मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत शिशु, तरुण आणि किशोर अशा तीन कॅटेगिरी मध्ये कर्ज मिळते.
शिशु कॅटेगिरी मध्ये 50000 रुपयांचे, तरुण कॅटेगिरी मध्ये पन्नास हजार रुपयांपासून पाच लाख रुपयांचे आणि किशोर कॅटेगिरी मध्ये पाच लाख रुपयांपासून ते दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते.
आता मात्र या अंतर्गत वीस लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. यामुळे नक्कीच व्यावसायिक लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे. हेच कारण आहे की केंद्रातील सरकारच्या या निर्णयाचे व्यावसायिकांनी तोंड भरून कौतुक केले आहे.