PM Ladli Lakshmi Yojana : भारत हा जगातील जलद गतीने विकसित होत असलेला देश. आपल्या देशाची अर्थव्यवस्था सध्या जगातील सर्वात मोठी पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. विशेष म्हणजे लवकरच देशाची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात मोठी तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.
एकंदरीत भारताची अर्थव्यवस्था ही जलद गतीने मोठी होत आहे. इंडियन इकॉनोमी मध्ये महिलांचा देखील मोठा वाटा आहे. परिणामी महिलांचे हित जोपासण्यासाठी आणि महिला सक्षमीकरण व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत.
मात्र असे असले तरी सोशल मीडियामध्ये काही बनावट योजनांची देखील माहिती वेगाने प्रसारित होत असते. यामुळे नेमक्या शासनाने सुरू केलेल्या योजना कोणत्या आणि बनावट योजना कोणत्या याबाबत सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळते.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये केंद्र शासनाने नव्याने पीएम लाडली लक्ष्मी योजना सुरू केली असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत देशभरातील महिलांना एक लाख 60 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य पुरवले जात असल्याचा दावा देखील सोशल मीडियामध्ये केला जात आहे.
अशा परिस्थितीत आज आपण केंद्र शासनाने खरंच पीएम लाडली लक्ष्मी योजना सुरू केली आहे का? या अंतर्गत खरच महिलांना एक लाख 60 हजाराची आर्थिक मदत पुरवली जात आहे का याविषयी जाणून घेणार आहोत.
काय आहे या योजनेमागील सत्यता
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील मोदी सरकारने पीएम लाडली लक्ष्मी योजना नावाची कोणतीच योजना सुरू केलेली नाही. अर्थातच सोशल मीडियामध्ये केला जाणारा हा दावा खोटा आहे. यामुळे नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये असे जाणकारांनी स्पष्ट केले आहे.
सोशल मीडियामध्ये सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पीएम लाडली लक्ष्मी योजना नावाची एक नवीन योजना केंद्र शासनाने सुरू केली असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तसेच या योजनेअंतर्गत मुलींना वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर एक लाख 60 हजार रुपयांपर्यंतची रक्कम दिली जात असल्याचे म्हटले गेले आहे.
मात्र शासनाने अशी कोणतीच योजना सुरू नसल्याची माहिती दिलेली आहे. यामुळे अशा भ्रामक व्हिडिओ पासून सावध राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.