Kusum Solar Pump Scheme : शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून कायमच वेगवेगळ्या कल्याणकारी योजना सुरू केल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी आर्थिक मदत करणे हा शासनाचा मुख्य उद्देश असतो. पीएम कुसुम सोलर पंप योजना ही देखील अशीच एक योजना 2021 पासून देशभरात लागू आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना अनुदानावर सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जातात.
खरं पाहता शेतकऱ्यांना शेतीसाठी अजूनही दिवसा वीज उपलब्ध होत नसल्याने, तसेच भारनियमनामुळे अनेकदा विहिरीत पाणी असूनही पिकाला पाणी देता येत नाही. यामुळे शासनाने ही योजना सुरू केली आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90% अनुदानावर सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जातात तसेच एससी आणि एसटी कॅटेगिरी मधील शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदानावर या योजनेअंतर्गत सोलर कृषी पंप उपलब्ध होतात. अशा परिस्थितीत आज आपण या योजनेसाठी आवश्यक निकष, पात्रता आणि कागदपत्रांची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पीएम कुसुम सोलर योजनेसाठी असलेले निकष खालीलप्रमाणे
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ज्या शेतकऱ्यांनी अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत आधीच लाभ घेतला असेल असे शेतकरी बांधव या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. मात्र ज्या शेतकऱ्यांनी फक्त या योजनेसाठी अर्ज केलेले असतील आणि अर्ज अद्याप मंजूर झालेले नसतील तर हे अर्जदार पात्र राहणार आहेत.
तसेच या योजनेअंतर्गत अनुदानावर सौर कृषी पंपाचा लाभ उचलण्यासाठी बोरवेल, विहीर, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील, शेततळे तसेच पाण्याचा शाश्वत स्रोत शेतामध्ये असणे आवश्यक राहणार आहे.
ज्या शेतकऱ्यांची शेती ही दुर्गम भागात आहे. ज्या ठिकाणी वीज कनेक्शन हे उपलब्ध नाही असे शेतकरी देखील या योजनेअंतर्गत अर्जासाठी पात्र राहणार आहेत.
या योजनेची एक मोठी विशेषता अशी की, शेतकऱ्यांकडे असलेल्या क्षेत्रानुसार हे सौर पंप शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
म्हणजे 2.5 एकर शेतजमीन असणारे शेतकरी 3 HP ,5 एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 HP, तसेच 5 एकर पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना 7.5 HP तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप यासाठी अनुदान हे दिले जाणार आहे.
Pm Kusum Yojana : पीएम कुसुम योजनेच्या पात्रता, कागदपत्रे अन, अर्ज करण्याची पद्धत