पीएम कुसुम सोलर योजनेसाठी पात्रता नेमक्या काय
या योजनेअंतर्गत अनुदानावर सौर कृषी पंप प्राप्त करण्यासाठी शेतकरी बांधव हे भारताचे नागरिक असावेत.
पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
शेततळे विहीर बोरवेल नदी नाले यांच्या शेजारील शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र राहतील.
अटल सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप अंतर्गत लाभ न मिळालेले शेतकरी देखील या योजनेसाठी पात्र राहणार आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
दरम्यान ही एक शासकीय योजना असून यासाठी शेतकऱ्यांना काही अर्जाची पूर्तता करावी लागणार आहे. यामध्ये अर्जदार शेतकऱ्याला सातबारा उतारा (त्यावर विहिरीची किंवा बोरची नोंद आवश्यक), आधार कार्ड, पासपोर्ट साईझ फोटो, रेशन कार्ड, नोंदणी प्रत, प्राधिकरण पत्र, जमीन प्रत, मोबाइल नंबर, बँक स्टेटमेंट इत्यादी कागदपत्रांचा समावेश राहणार आहे.