Pm Kisan Yojana : तुम्हीही पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहात का ? मग तुमच्यासाठी ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. खरेतर, पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 ला झाली आहे. तेव्हापासून ही योजना अविरतपणे सुरू आहे.
याअंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहेत. पण, हे पैसे शेतकऱ्यांना एकमुस्त मिळत नाहीत. दर चार महिन्यांनी या योजनेअंतर्गत दोन हजार रुपयाचा एक हप्ता दिला जातो.
म्हणजेच एका आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत तीन हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.
मागील 16वा हप्ता हा 28 फेब्रुवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथील आयोजित एका कार्यक्रमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.
यावेळी पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी योजनेचे देखील दोन हप्ते पात्र शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. अर्थातच राज्यातील पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना या हप्त्यासोबत एकूण सहा हजार रुपये मिळाले आहेत.
मात्र अनेकांच्या माध्यमातून त्यांना पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता अजूनही मिळाला नसल्याची तक्रार केली जात होती. अशा परिस्थितीत आता आपण या योजनेचा सोळावा हफ्ता जर शेतकऱ्यांना मिळालेला नसेल तर त्यांनी कुठे तक्रार केली पाहिजे? याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कुठ तक्रार करणार ?
जर तुम्ही पीएम किसान योजनेसाठी पात्र असाल अन पात्र असूनही तुम्हाला याचा 2,000 चा 16वा हप्ता मिळाला नसेल, तर तुम्ही समस्येची चौकशी करण्यासाठी तक्रार दाखल करू शकता.
पीएम किसान टीमपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तुम्ही तुमची तक्रार ई-मेल करूनही दाखल करू शकता. तुम्ही pmkisan- [email protected] किंवा pmkisan- [email protected] वर ईमेल पाठवू शकता.
तसेच तुम्ही प्रतिनिधीशी थेट बोलण्यासाठी 011-24300606 किंवा 155261 वर कॉल करू शकता. शिवाय पीएम किसान टीमशी कनेक्ट होण्यासाठी 1800-115-526 या टोल फ्री क्रमांकावर देखील तुम्ही संपर्क साधू शकता.
या संबंधित पर्यायाने तुम्ही पीएम किसान योजनेच्या प्रतिनिधीशी कनेक्ट होऊन तुमची समस्या सांगू शकता आणि तुमच्या समस्येचे निराकरण देखील केले जाणार आहे.