Pm Kisan Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील सर्वच वंचित घटकांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या जातात. शेतकऱ्यांसाठी देखील सरकारकडून विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. केंद्रातील मोदी सरकारने 2019 साली शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक महत्त्वकांक्षी योजना सुरू केली असून या अंतर्गत शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे.
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. मात्र हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाहीत. दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक चार महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजाराचा एक हप्ता जमा होत असतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या योजनेचा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करतात. आतापर्यंत या योजनेचे एकूण 18 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून आता 19 व्या हफ्त्याची आतुरता लागून आहे. मीडिया रिपोर्टनुसार या योजनेचा पुढील हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे.
याबाबत सरकारकडून कोणतीचं अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र या योजनेचा आतापर्यंतचा पॅटर्न पाहिला असता प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचा पैसा लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असतो. त्यानुसार या योजनेचा पुढील हप्ता फेब्रुवारी महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नक्कीचं या योजनेचा पुढील हफ्ता फेब्रुवारी महिन्यात जमा झाला तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. खरंतर ही योजना 2019 मध्ये सुरू झाली म्हणजेच ही योजना सुरू होऊन आता पाच वर्षांपेक्षा अधिकचा काळ झाला आहे, पण आजही या योजनेच्या नियमांबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.
दरम्यान मध्यँतरी या योजनेच्या नियमांमध्ये देखील बदल करण्यात आला होता. अशा परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून या योजनेच्या नव्या नियमानुसार, शेतकरी पती अन पत्नी दोघांनाही याचा लाभ मिळतो कां? हा प्रश्न विचारला जातोय म्हणून आज आपण याच बाबत माहिती पाहणार आहोत.
पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या नियमानुसार या योजनेचा लाभ कुटुंबातील एकाच सदस्याला मिळतो. पती-पत्नी आणि अठरा वर्षाखालील अपत्य अशा एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या शेतकरी योजनेचा लाभ मिळतो. म्हणजेच जर पतीला या योजनेचा लाभ मिळत असेल तर पत्नीला या योजनेचा लाभ मिळू शकत नाही.
महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा लाभ फक्त ज्याच्या नावावर शेत जमीन आहे त्याच व्यक्तीला मिळतो. म्हणजेच पती आणि पत्नी या दोघांपैकी ज्या व्यक्तीच्या नावावर शेत जमीन असेल त्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
समजा एखाद्या प्रकरणात पती आणि पत्नी दोघांच्या नावावर जमीन असेल तर अशा प्रकरणांमध्ये पती किंवा पत्नी या दोघांपैकी एकालाच या योजनेचा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे. जर समजा एखाद्या कुटुंबात दोन भाऊ एकत्रितपणे राहत असतील तर अशा कुटुंबात देखील दोन भावांपैकी एकाच भावाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.