Pm Kisan Yojana : पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता 5 ऑक्टोबर 2024 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. स्वतः केंद्रातील मोदी सरकारनेच याबाबत माहिती दिली आहे. पी एम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 18 वा हप्ता हा 5 ऑक्टोबर 2024 ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचे पुढील हफ्त्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहेत. खरे तर 5 ऑक्टोबर च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा आहे. 5 ऑक्टोबरला ते वाशिम येथे राहणार आहेत.
दरम्यान, वाशिम येथे आयोजित कार्यक्रमातूनच पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांना दिला जाण्याची शक्यता आता व्यक्त होऊ लागली आहे.
मात्र या योजनेचा पुढील हप्ता तुम्हाला मिळणार की नाही ? याबाबत जर तुमच्या मनात शंका असेल तर काळजी करू नका. आज आपण या योजनेचा पुढील हप्ता तुम्हाला मिळणार की नाही हे कसे चेक करायचे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
अठरावा हप्ता मिळणार की नाही कसं चेक करणार?
ज्या शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीत असतील त्यांनाच १८ वा हप्ता दिला जाईल. मात्र, काही चुकांमुळे तुमचे नाव या यादीतून कापले जाऊ शकते. मात्र आज आपण अशी पद्धत सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेची लाभार्थी यादी पाहू शकता आणि तुमचे नाव तपासू शकता.
तुमचे नाव पीएम किसान सन्मान निधी योजनेत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी पी एम किसान च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. pmkisan.gov.in या लिंकवर क्लिक करून तुम्ही थेट अधिकृत संकेतस्थळावर जाल.
मग वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला Know Your Status या पर्यायावर जायचे आहे. येथे तुम्हाला नोंदणी क्रमांक विचारला जाईल. तुमचा नोंदणी क्रमांक टाकून तुम्हाला तुमची स्थिती तपासता येणार आहे.
यासाठी उजव्या बाजूला दिसणाऱ्या लाभार्थी यादीच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे. येथे तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडावे लागेल. यानंतर Get Report या पर्यायावर क्लिक करा.
आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या तुमच्या संपूर्ण गावाची लाभार्थी यादी तुमच्यासमोर उघडेल. यामध्ये तुम्ही तुमचे नाव सहज शोधू शकता आणि तुमचे नाव या यादीत समाविष्ट आहे की नाही हे जाणून घेऊ शकता.