Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना आणि याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. उद्या अर्थातच 5 ऑक्टोबरला या दोन्ही योजनांचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
पीएम किसान चा अठरावा हफ्ता आणि नमो शेतकरी चा पाचवा हप्ता उद्या जमा केला जाणार आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील पीएम किसान साठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना उद्या चार हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे.
नवरात्र उत्सवाच्या काळात या योजनांचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने याचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिम येथे आयोजित एका कार्यक्रमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हा पैसा जमा करणार आहेत.
यामुळे आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे या सोहळ्याकडे लक्ष लागले आहे. मात्र या योजनेचे पैसे आमच्या बँक खात्यात जमा होणार की नाही असा सवाल अनेकांच्या माध्यमातून उपस्थित केला जातो.
दरम्यान आता आपण याच संदर्भात माहिती पाहणार आहोत. या योजनेचे पुढील हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार की नाही हे कसे चेक करायचे याविषयी आता आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
तुम्हाला पीएम किसानचे आणि नमो शेतकरीचे पैसे मिळणार की नाहीत?
पी एम किसान चा आणि नमो शेतकरी चा पुढील हफ्ता तुमच्या खात्यात जमा होणार की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला पीएम किसान च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे.
यासाठी https://pmkisan.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला फार्मर्स कॉर्नर हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला बेनिफिशियल लिस्ट म्हणजेच लाभार्थी यादी या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला राज्य, जिल्हा, तालुका आणि तुमच्या गावाचे नाव निवडायचे आहे. यानंतर तुम्हाला गेट रिपोर्ट म्हणजेच अहवाल मिळवा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये लाभार्थी यादी डाऊनलोड करायची आहे. ही यादी डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला या यादीमध्ये तुमचे नाव शोधायचे आहे.
या यादीत तुमच्या गावातील पीएम किसान साठी पात्र ठरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची नावे राहणार आहेत. या यादीत जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. मात्र जर तुमचे या यादीत नाव नसेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही.