Pm Kisan Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहे. पीएम किसान योजना ही अशीच एक शेतकरी हिताची योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली. 2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहेत.
हे सहा हजार रुपये मात्र शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे वितरित होत आहेत. आतापर्यंत या योजनेचे 15 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. आता शेतकऱ्यांना या योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरता लागली आहे.
या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार हा मोठा सवाल आहे. खरेतर पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने नमो शेतकरी योजना सुरू केली आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेअंतर्गतही राज्यातील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहेत.
विशेष म्हणजे या योजनेचे स्वरूप देखील पीएम किसान प्रमाणेच आहे. या योजनेअंतर्गतही दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे 6,000 रुपयांचे वाटप केले जात आहे.
दरम्यान नुकत्याच काही दिवसांपूर्वी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होणार असे वृत्त समोर आले होते.
याबाबत राज्य शासनाने कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही मात्र मीडिया रिपोर्ट मध्ये असा दावा केला जात आहे. यानंतर आता पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याबाबत देखील प्रसारमाध्यमांमध्ये मोठा दावा केला जात आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये सांगितल्याप्रमाणे पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच सोळावा हप्ता हा शेतकऱ्यांचा खात्यावर फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे.
यामुळे पीएम किसानचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरीचा दुसरा हप्ता सोबतच जमा होऊ शकतो, असे वाटत आहे.
तथापि, पीएम किसानचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरीचा दुसरा हप्ता सोबतच शेतकऱ्यांचा खात्यात जमा होणार का आणि हा हप्ता फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार का ? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.